अंतर्वस्त्रात लपवून आणलेले सव्वा किलो सोने जप्त

अंतर्वस्त्रात लपवून आणलेले सव्वा किलो सोने जप्त

नागपूर : नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून अंतर्वस्त्रात लपवूनआणलेले सव्वा किलो सोने जप्त केले. मुंबईहून गो एअर विमानाने नागपूर विमानतळावर आलेल्या या प्रवाशांकडून पेस्ट स्वरूपातील 68.60 लाख रुपये किमतीचे हे सोने होते. अब्दुल रकीब (वय 25, रा. कर्नाटक, सध्या मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी अब्दुल हा मंबई येथून गो एअर कंपनीच्या जी 8-2601 विमानाने सकाळी 8.05 वाजता नागपूरला आला. त्यानंतर चौकशीदरम्यान त्याच्याकडे तीन नावांचे आधार कार्ड आढळून आले. चौकशीत सोन्यासंदर्भात आरोपी अब्दुलला विचारणा केली असता त्याने हे सोने विदेशातून मुंबईत आल्यानंतर ते मी नागपुरात आणल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news