उत्तर महाराष्ट्र

पुढारी इम्पॅक्ट : पिंपळनेरवासियांच्या रास्तारोकोला यश; महामार्गाचे काम अखेर सुरू

अंजली राऊत

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

"आम्ही पिंपळनेरकर" या बॅनरखाली एकत्र येत पिंपळनेरवासियांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२-जी रस्ता जो अक्षरश: खड्ड्यात हरवला आहे. पिंपळनेराहून ताहराबाद, सटाणा, नाशिककडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल वेळोवेळी पिंपळनेरकरांनी आवाज उठविला. परंतु, झोपलेले प्रशासन जागे झाले नसल्याने अखेर पिंपळनेरवासीयांनी बुधवार, दि. २३ रोजी शहरातून एकाचवेळी अनेक ठिकाणी महामार्ग अडवत ऐतिहासिक रास्ता रोको केल्याने आंदोलना यश मिळाले असून रखडलेल्या कामाला जे. टी. पॉइंट, सोना गॅस एजन्सी पासून सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी अभियंता कदम, डॉ. पंकज चोरडिया, ग्रामपंचायत सदस्य जे. टी. नगरकर यांच्या हस्ते कामास प्रारंभ करण्यात आला. काम सुरू झाल्याने आंदोलनकर्त्यांना  यश मिळाले आहे. दिलेल्या मुदतीत संपूर्ण काम पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात असून 'आम्ही पिंपळनेरकर' च्या संकल्पनेतून पिंपळनेकर नागरीक व व्यावसायिक यांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्ग बंद आंदोलनामुळे काम मार्गी लागले आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार प्रवीण चव्हाणके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता दिलीप वानखडे व त्यांचे सहकारी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींना रस्त्याचे चौपदरीकरण कॉंक्रीटीकरणाचे काम दोन दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार शनिवार, दि.26 रोजी राष्ट्रीय महामार्ग जे. टी. पॉईंट, सोना गॅस एजन्सी पासून या कामाला सुरुवात झालेली आहे. याप्रसंगी डॉ. पंकज चोरडिया, ग्रामपंचायत सदस्य जे. टी. नगरकर, निलेश कोठावदे, रस्ते विकास महामंडळाचे संबंधित अभियंता विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभ झालेला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT