जळगाव; पुढारी वृत्तसेवा: बैलगाडीसह शेतमजूर विहिरीत पडल्याने शेतमजूरासह बैलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. १४) रोजी रात्री यावल तालुक्यातील बामणोद शिवारात १२ .३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विश्वनाथ रामसिंग सोनवणे (वय- ६५, रा. हातेड ता. चोपडा ह.मु. बामणोद ता. यावल) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, विश्वनाथ सोनवणे हे सुरेश टिकाराम भंगाळे (रा. बामणोद, ता. यावल) यांच्या शेतात कामाच्या निमित्ताने बामणोद शिवारात गुरूवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बैलगाडीने गेले होते.
या दरम्यान रात्रीच्या वेळी शेतात बैलगाडीने जात असताना अंधाऱ्यात विहिर न दिसल्यामुळे बैलगाडीसह विश्वनाथ सोनवणे पाण्यात पडले. यात विश्वनाथ सोनवणे या शेतमजूरासह बैलाचा बुडून मृत्यू झाला.
हा प्रकार शुक्रवारी (दि. १५) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लक्षात आला. सुरेश टिकाराम भंगाळे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर पाटील करीत आहे.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडेच्या पावसाने चेरांपुजीलाही 'घामटा' फुटतो