उत्तर महाराष्ट्र

मविआ नेत्यांची प्रकरणे लपविण्यासाठीच फडणवीस यांची चौकशी : ना. कपिल पाटील

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सक्षम नेतृत्व असून, त्यांना कमकुवत करण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. वास्तविक महाविकास आघाडीच्या नेत्यांची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्याने, ते लपविण्यासाठी फडणवीस यांना चौकशीत अडकवले जात असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते, विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारने बजावलेल्या नोटिशीबाबत विचारले असता, त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असून, त्यांचे विशेष अधिकार आहेत. त्यांनी मिळविलेल्या माहितीविषयी कोणीही प्रश्न विचारू शकत नसल्याचे फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. फडणवीस हे महाराष्ट्रात भाजपचे शक्तिस्थान आहेत. शक्तिस्थानावरच वार करून विरोधकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत असल्याची टीकाही त्यांनी याप्रसंगी केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT