उत्तर महाराष्ट्र

Election : नाशिक, धुळेसह राज्यातील १०५ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

backup backup

धडगाव, रोषमाळ, साक्री यासह राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाला असून, आचार संहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार जिल्हाधिकारी हे दिनांक 30 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत दिनांक 1 डिसेंबर पासून 7 डिसेंबर 2021 पर्यंत राहील. माघारीची अंतिम मुदत दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत राहील. मतदान दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी होईल.

राज्यातील एप्रिल, २०२० ते मे, २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ८१ व डिसेंबर, २०२१ मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या १८ तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा निवडणूक कार्यक्रम आहे.

नाशिक, धुळे, नंदूरबार,  ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर,अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथील नगरपंचायतींचा यात समावेश आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नगरपंचायती

निवडणूक (Election) लागलेल्या नगरपंचायती याप्रमाणे… नाशिक जिल्हा-नातेपुते (नवनिर्मित), निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा. धुळे जिल्ह्यात एकमेव साक्री. नंदुरबार जिल्हा- धडगाव- वडफळ्या, रोषणमाळ. अहमदनगर जिल्हा- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी. जळगाव जिल्ह्यात बोदवड नगपपंचायतीचा समावेश आहे.

काय आहेत आयोगाच्या सूचना?

निवडणुकीची (Election) आचारसंहिता आजपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. वरील आचारसंहिता सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संपूर्ण संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लागू राहील. उपरोक्त क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्रसुद्धा करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट नमूद केले आहे.

प्रभाग रचना शासन राजपत्रात अंतिमरित्या प्रसिद्ध झालेली असून दि. १७ नोव्हेंबर २०२१ च्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन दि.२९/११/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहेत.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ९ अ नुसार राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने नामनिर्देशन पत्रासोबत जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

निवडणुकांकरिता प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जिल्‍हाधिकारी हे 29 नोव्हेंबर रोजी जाहीर करतील. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवाराना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र सहजरितीने भरता यावे यासाठी महाऑनलाईनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. सर्व संभाव्य उमेदवारांनी सॉफ्टवेअरद्वारेच नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. त्यांनी http;//panchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये स्वतःची नोंदणी (Register) करुन घ्यावी व नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी. त्यावर स्वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावे, असे निवडणूक आयोगाचे सचिव यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशनपत्राचा अर्ज नामनिर्देशनपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT