पिंपळनेर : मुसळधारेमुळे नवापाडा येथील तुडुंब भरलेले डकबीन धरण. अनेक भागांतील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने पीके पाण्याखाली गेले आहेत. तर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे दळणवळण ठप्प झाले आहे. (छाया: अंबादास बेनुस्कर). 
उत्तर महाराष्ट्र

धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर

अंजली राऊत

धुळे (पिंपळनेर,ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
आठवड्याभरापासून साक्री तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत तुफान बॅटिंग केल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत. तसेच चोवीस तासाच्या संततधारेमुळे पांझरानदी नाल्यांनाही पूर आला आहे. रहिवाशांना पावसाचा चांगलाच फटका बसला असून काही ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. तर अनेक भागांतील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने पीके पाण्याखाली गेल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मुसळधारमुळे पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून संततधार पावसामुळे पिंपळनेरकरांचे दळणवळणाच्या सोयी ठप्प झाल्या आहेत. नुकत्याच पेरणी होऊन रोपे आलेल्या शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हातची पिके पाण्याखाली आले आहे. त्यामुळे शेतक-यांना अस्मानी सोबतच सुलतानी संकटांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. आ.मा.पाटील विद्यालया जवळील लहान फरशी पुलावरून पाणी जात असल्याने प्रवास खोंळबला आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेती कामांना ब्रेक लागला आहे. निंदणी, कोळपणी, औषध फवारणी, पिकांना खत देणे इत्यादी कामे खोळंबल्याने पिकांची वाढही खुंटली आहे. संततधारमुळे नवापाडा येथील डकबीन धरणही तुडुंब भरल्याने नदी नाल्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असला तरी अती प्रमाणात झालेला पाऊस पिकांसाठी धोकादायक ठरत असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT