पुणे : वाजत-गाजत वृक्ष लागवड; हुतात्मा बाबू गेणु स्मृतीवनात ७५ झाडांचे रोपण | पुढारी

पुणे : वाजत-गाजत वृक्ष लागवड; हुतात्मा बाबू गेणु स्मृतीवनात ७५ झाडांचे रोपण

महाळुंगे पडवळ, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्यदिनानिमित्त महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) हुतात्मा बाबू गेनू सैद स्मृतिवनाची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी विविध ७५ रोपांची लागवड करण्यात आली.

जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून व सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम झाला. हुतात्मा बाबू गेणु सैद यांचे वंशज किसनराव सैद यांच्या हस्ते वडाचे रोप लागवड करून स्मृतीवन तयार करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी सरपंच सुजाता चासकर, ह.भ.प. रामचंद्र चासकर, पोलीस पाटील संगीता पडवळ, बी. टी. आवटे, सचिन चासकर, प्रतिभा भोर, बाळासाहेब जाधव, प्रदीप कासारे, संभाजी गायकवाड, सोनल ढोले, वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक प्रदीप औटी व वनपरिक्षेत्र मंचर, घोडेगाव, खेड तालुक्यातील वन अधिकारी व कर्मचारी तसेच महाळुंगे पडवळ ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button