File photo  
उत्तर महाराष्ट्र

जळगाव : ४० लाखांच्‍या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण, पोलिसांनी सिनेस्टाईल केला प्रकरणाचा पर्दाफाश

अनुराधा कोरवी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा :  जळगाव येथील जिजाऊ नगर येथे बायोडिझेलच्या व्रिकीसह खरेदीच्या व्यवहारापोटी दिलेले व्याजासह एकूण ४० लाख रुपये परत दिले नाही म्हणून बांधकाम व्यावसायिक मयूर वसंत सोनवणे उर्फ मयूर महाजन (वय ३५ रा. जिजाऊ नगर, जळगाव) यांचे  अपहरण करून त्याला धाक दाखवण्यासाठी सात आठ जणांना सुपारी दिली.  सुपारी घेतलेल्यांनी मयूर महाजन यांच्यासह त्याच्या दोन्ही चालकांना नाशिक, संगमनेर, अजिंठा ठिकाणी डांबून ठेवले. तसेच  बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणाचा रामानंदनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पर्दाफाश केला. पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांची सुटका करुन आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी मयूर महाजन यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे  की,  मयूर सोनवणे उर्फ महाजन यांची नाशिक येथे संस्कार एंटरप्रायजेस नावाची फर्म आहे. चार महिन्यांपूर्वी महाजन हे बायोडिझेल होलसेल विक्रीचा व्यवसाय करत होते. यादरम्यान त्यांची मलिक नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. ओळखीतून मलिक याच्यासोबत महाजन यांचा बायोडिझेलचा व्यवहार झाला होता.

या व्यवहारापोटी मलिक याने महाजन यांना ८० लाख रुपये दिले होते. त्यापैकी ठरल्या व्यवहाराप्रमाणे महाजन यांनी मलिक याला ७८ लाख रुपये किंमतीचे चार टँकर बायोडिझेल पुरविले होते. दोन लाख रुपये बाकी असताना, मलिक याने फोन करुन महाजन यांना १८ लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले. तसेच व्याजासह ही रक्कम ४० लाख रुपये असून ती रक्कम परत करण्याचे महाजन यांना सांगितले. दरम्यान, कोरोना असल्याने व्यवहार बंद झाले. त्‍यामुळे मयूर महाजन यांना मलिक याची उर्वरीत रक्कम परत करता आली नाही. यातून मलिक याने महाजनांची सुपारी दिली. सुपारी घेतलेल्या सात ते आठ जणांनी महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांना बहाणा करुन बोलावून घेवून अपहरण केले.  वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

पत्‍नीसह बहिणीला पाठवले लाेकेशन

सिल्लोड रोडने महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांना घेवून जात असताना महाजन यांनी संबंधितांकडे  पैसे देण्यासाठी मोबाईल फाेन मागितला. यादरम्यान महाजन यांनी त्यांची पत्नी शमीका हिच्याशी बोलणे करुन तिला मोबाईलवरुन लोकेशन पाठविले. तसेच महाजन यांनी त्यांची जळगावातील बहिण माधुरी चव्हाण हिला सुध्दा लोकेशन पाठविले. हा प्रकार महाजन यांनी संबंधितांना समजू दिला नाही. जळगावात लोकेशन तसेच महाजन यांच्यासोबत घडल्या प्रकाराबाबत महाजन यांची बहिणी माधुरी चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली.

तक्रारीनुसार पोलिसांनी मयूर महाजन यांच्या मोबाईल लोकेशनवरुन सिल्लोड रोडवरील साईमिलन हॉटेल गाठले. येथे डांबून ठेवलेल्या महाजन यांच्यासह त्यांचे चालक विजय सुभाष इंगळे व सागर जीवन विसपूते या तिघांची पोलिसांनी सुटका केली.

रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळावरुन अमजद दाऊद सैय्यद, शेख बिलाल गुलाम, मजाज दाऊद सैय्यद, अब्दुल नासिर गफ्फार, इम्रान इलियास शेख, अजीम अजीज शेख, शहानवाज वजीन खान, अबुकर सलीम मलिक या आठ जणांना ताब्यात घेतले. तर, दोन जण गाडीतून पसार झाले. सुखरुप सुटका झाल्यानंतर मयूर महाजन यांनी घडल्याप्रकाराबाबत शनिवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT