क्राईम 
उत्तर महाराष्ट्र

Ration grain : रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री, दोघांवर गुन्हा दाखल

अनुराधा कोरवी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: येथील कमल जिनिंग मील मध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने छापा टाकला होता. यानंतर दोन दिवसांची पंचनामा करून हा सर्व प्रकार रेशनचे धान्य ( Ration grain ) काळ्या बाजारात विकण्याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ११.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत निलेश नामदेव मुसळे (वय.४५ रा. धरीणी चौक, धरणगाव) आणि शेख आमीर शेख बुडन (वय.३२ रा.मलकापुरा, वार्ड नं.२१, दुर्गानगर, ता. मलकापुरा, जि. बुलडाणा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चोपडा रोडवरील कमल जिनिंग मील मध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर यांच्या निर्देशाने पोलिसांनी छापा टाकण्‍यात आला. ही कारवाई विशेष पथकाचे सपोनि सचिन पांडुरंग जाधव, पो.ना. प्रमोद मंडलिक, सहा. फौजदार बशीर गुलाब तडवी यांच्या पथकाने केली.

रेशनच्या मालात भेसळ करून अन्यत्र विक्री

या कारवाईवेळी  रेशन धान्याचा (Ration grain ) अवैध साठा आढळून आला. यात रेशनच्या मालात भेसळ करून ते अन्यत्र विक्रीसाठी नेले जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते. तथापी, याबाबत पूर्ण शहानिशा करण्याचे महसूल प्रशासनाने सूचित केले होते. यानूसार दुसर्‍या दिवशी म्हणजेच, ८ ऑक्टोबर रोजी पुरवठा निरिक्षक संजय घुले यांनी आपल्या सहकार्‍यांसह या धान्याचा पंचनामा केला.

पंचनामा करताना या फॅक्टरीत आढळून आलेले इसम तसेच ट्रक चालकांना विचारणा केली असता त्यांनी पहिल्यांदा समाधानकारक उत्तर दिली नाहीत. यात निलेश नामदेव मुसळे आणि शेख आमीर शेख बुडन या दोघांचा समावेश होता.

पोलिसांनी याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर निलेश मुसळे यांने हा धान्यसाठा आपला असून, आपण इतरत्र विकण्यासाठी शेख आमीर यांना विकला असल्याचे सांगितले.

तांदुळ व गहुचा साठा 'त्याने' कुठून आणला?

सदर तांदुळ व गहुचा साठा त्याने कुठून आणला? याबाबत अधिक चाैकशी केली असता त्याने हा माल हा ओम ट्रेडर्स(ऐ. बी. रोड सांगवी, जि. धुळे) व निलेश ट्रेडींग (मराठे लेन, धरणगाव, जि.जळगाव) या कंपनीकडून खरेदी केली असून, गोडावुनमध्ये असलेले एफ. सी. आय.चे रिकामे बारदाने हे नागणेशी ट्रेडीगं कपनी, कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव यांच्याकडून खरेदी केली असल्याचे नमूद केले.

तर संबंधित गोडावून आपण दिलीप एकनाथ महाले (रा. धरणगाव) यांच्याकडून भाड्याने घेतल्याची माहिती दिली. याचदरम्यान यासाठी सादर केलेला करारनामा हा छाप्याच्या दिवसाचा अर्थात ७ ऑक्टोबर २०२१ चा असल्याचे तपासात दिसून आले.

या सर्व बाबींचा विचार करून पोलिस पथकाने गहू आणि तांदूळाचा साठा आणि याला वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रक जप्त केला. हा संपूर्ण ऐवज १२ लाख ६३ हजार ४३० रूपयांचा असल्याचे आढळून आले. या संदर्भात सहायक पोलीस निरिक्षक सचिन पांडुरंग जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार निलेश नामदेव मुसळे आणि शेख आमीर शेख यांच्याविराेधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT