तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; नराधम तरुणाला अटक | पुढारी

तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; नराधम तरुणाला अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

यावल तालुक्यातील दहिगाव येथे २५ वर्षाच्या तरूणाने तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील दहिगाव येथे काल सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान २५ वर्षाच्या नराधमाने भाडेकरुच्या तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार घडला. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दहीगाव येथे एक मजूर कुटुंब आपल्या एक मुलगा आणि एक मुलीसह राहते. ते एका घरात भाड्याने राहत असून घर मालकाचा मुलगा कैलास प्रल्हाद पाटील (वय २५) याने काल सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान, त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला दहा रूपये देण्याचे आमीष दाखवून घरात नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. बालिकेची आई घरी आली असता तिला हा सर्व प्रकार समजला. तिने कैलासच्या कानशिलात लगावली असता तो तेथून पळून गेला.

कुटुंबाने पोलिसात दिली तक्रार ( तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार )

दरम्यान, या प्रकारामुळे संबंधीत कुटुंबाला भयंकर धक्का बसला असून त्यांनी आज यावल पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. यानुसार कैलास प्रल्हाद पाटील ( वय२५, रा. दहीगाव, ता. यावल ) याच्या विरूध्द भादंवि कलम ३७६, ३७६-अ, ३७५, ३५४, तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३, ४ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या आदेशावरून पोलीस हेड कॉस्टेबल अस्लम खान यांनी दहिगाव येथे जावून आरोपी हा पळवून जाण्याच्या बेतात असतांना त्यास अटक केली. या कामी त्यांना दहीगाव येथील गृहरक्षक दलाचे जनार्दन महाजन यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद मधुकर खांडबहाले हे करीत आहेत.

हेही  वाचले का? 

Back to top button