श्रीरामपूर: ग्रामपंचायत सदस्यासह दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. तालुक्यातील उक्कलगाव येथे बेलापूर - कोल्हार रस्त्यावर ही सिनेस्टाईल घटना घडली. 21 जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास उक्कलगाव- कोल्हार रोडवरील शिंदे वस्तीजवळ खारा ओढा येथे रविंद्र थोरात यांच्या द्राक्ष बागेत फवारणी करण्यासाठी पोपट भाऊसाहेब भणगे (रा. राजुरी, ता. राहाता) हे मशिन व ट्रॅक्टरसह आले होते.
कोल्हार रोडवर उबाळे यांचा पिकअप व भणगे यांच्या ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला. यावेळी गावातील अजय दिलीप पवार, सुनील ऊर्फ भैय्या गवळी, प्रल्हाद भागवत पवार, बाळू भागवत पवार हे अपघातस्थळी आले.
दरम्यान शरद थोरात उक्कलगावचा बाजार करुन, मोटार सायकलवरुन उक्कलगाव- कोल्हार रोडवरुन घरी जात होते. शिंदे वस्ती जवळील खाराओढा येथे आले असता, तेथे त्यांना गावातील रविंद्र किशोर थोरात व बापूसाहेब एकनाथ थोरात हे पोपट भाऊसाहेब भणगे व उबाळे यांच्यातील अपघाताचा वाद मिटवताना दिसले.
वाद सोडविण्यासाठी ते गेले असता, अजय दिलीप पवार, सुनील ऊर्फ भैय्या गवळी, प्रल्हाद भागवत पवार व बाळू भागवत पवार हे थोरात यांना म्हणाले की, ‘तुमचा अपघाताशी काही संबंध नाही,’ असे म्हणत अर्वाच्य शिविगाळ करुन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘जिवे ठार मारु,’ अशी धमकी दिली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात ग्रामपंचायत सदस्य शरद नानासाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून अजय दिलीप पवार, सुनिल ऊर्फ भैय्या गवळी, प्रल्हाद भागवत पवार व बाळू भागवत पवार (सर्व रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड काँस्टेबल बाळासाहेब कोळपे करीत आहे.