श्रीरामपूर: लोकशाही मार्गाने ग्रामस्थांनी निवडुन दिलेल्या सरपंचांवर लोकाभिमुख काम करत असताना राजकीय द्वेषभावनेतून अन्याय होत असेल, अशा ठिकाणी आम्ही समर्थपणे पाठिशी उभे राहू, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी केले.
श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील सरपंचाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काळे पुढे म्हणाले की, सरपंच हा पंचायतराजचा अंत्यत महत्वाचा कणा आहे. सरपंचांना विकास काम करत असताना खुप अडचणींना सामोरे जावे लागते. काम करण्याची तळमळ असणाऱ्या या सरपंचना राजकीय दबावामुळे विनाकारण खोट्या केसेसमध्ये अडकवले जाते.
ज्या ठिकाणी सरपंचावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही सरपंचाच्या मागे उभे राहू. प्रशासक ऐवजी सरपंचांनाच काम करता यावे, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा सरपंच परिषदेच्या सरपंच दीपाली फरगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच सागर मुठे, सरपंच शीतल पटारे, सरपंच छाया बर्डे, कार्लस साठे, साहेबराव चोरमल यांनी मनोगत व्यक्त केले
या बैठकीस शिरसगाव सरपंच राणिताई वाघमारे, माळेवाडी सरपंच जयश्री सोपानराव औताडे, दिघी सरपंच बंटी जाधव, करजगाव सरपंच योगेश आरंगळे, माजी सरपंच गणेश कोतकर, माळवाडगाव उपसरपंच शाम आसने, वडाळा सरपंच सचिन पवार, खानापूर सरपंच ज्ञानदेव आदिक, बेलापूर सरपंच साळवी, गोकुळ बनसोडे, बाबासाहेब भोंडगे, सर्जेराव घोडे, रंगनाथ कोळसे, गोकुळ मुठे, संतोष मुठे, चंद्रकांत खरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण फरगडे, तर आभार प्रताप पटारे यांनी मानले.