Police Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Police Staff Transfer: श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना वाद भोवला; दोघांची बदली

पोलिस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांची कारवाई; संदीप राऊत आश्वीला, संभाजी गर्जे श्रीरामपूर आरसीपीत

पुढारी वृत्तसेवा

पुढारी: श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेला वाद चांगलाच भोवला आहे. या वादानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे आपली बाजू मांडली होती. त्याबाबाबतचा अहवाला पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. प्राप्त अहवालाच्या आधारे पोलिस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,श्रीगोंदा पोलीस ठाण्यात असताना पोलिस कॉन्स्टेबल संदीप राऊत आणि पोलिस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. याबाबतचे वृत्त दैनिक पुढारी ने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली.

या वादाबाबत पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. उपअधीक्षकांनी दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठवला.

पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारत पोलीस ठाण्यातच वाद घालणे हे शिस्तीला धरून नाही.असे स्पष्ट करत दोन्ही कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदलीचे आदेश पारित केले आहेत. पोलिस कॉन्स्टेबल संदीप राऊत यांची आश्वी पोलिस ठाण्यात तर पोलिस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे यांची आरसीपी ( दंगल नियंत्रण पथक) श्रीरामपूर येथे बदली करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे. किरकोळ वाद जरी असला तरी पोलीस ठाण्याची प्रतिमा मलिन होईल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अधीक्षकांनी या बदलीच्या माध्यमातून दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT