संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आज रविवारी (दि.21) सकाळी दहा वाजता मतमोजणी होत आहे. दहा टेबलावर आठ फेऱ्यात मतमोजणी केली जाणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षासह 27 जागांसाठी 2 डिसेंबरला 73 टक्के मतदान झाले. 41 हजार 988 मतदारांनी मतदान हक्क बजावला होता. तर उर्वरित तीन प्रभागातील प्रत्येकी एक जागेसाठी शनिवारी (दि.21) रोजी मतदान झाले. यामुळे या सर्व तीस जागांसह नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी होत आहे.
या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. दहा टेबलावर आठ फेऱ्या होणार असून प्रत्येक टेबलावर दोन कर्मचारी, एक अधिकारी, एक असिस्टंट व एक शिपाई असे कर्मचारी तैनात करण्यात आले. 65 अधिकारी कर्मचारी मतमोजणी या प्रक्रियेत सहभागी होणार आहे. पहिली व सहावी फेरीसाठी आठ टेबल, दोन, तीन, पाच फेरीसाठी दहा टेबल. सात व आठ फेरीसाठी नऊ टेबलावर मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे.
सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणारा असून दुपारी बारा वाजेपर्यंत पहिला निकाल येण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी ईदगाह मैदान रोड, पोलिस स्टेशन परिसर, क्रीडा संकुल, नेहऊ उद्यान परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी 200 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 4 पोलिस निरीक्षक, 7 सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपअधिक्षक या मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. शहरात कुठेही अनुसूचित प्रकार घडु नयेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.समीर बारवकर, पोलिस निरीक्षक.
दहा टेबलवर संगमनेर नगरपालिकेची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या आठ फेऱ्या होणार असून सकाळी दहा वाजता मोजणीस सुरूवात होईल. मोजणीसाठी 65 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजता पहिला निकाल येण्याची शक्यता आहे.दयानंद गोरे, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार