Sangamner Dairy 'Mission 50 Litre' Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Dairy 'Mission 50 Litre': संगमनेरमध्ये दुग्धक्रांतीचा नवा टप्पा; पंजाबसोबत करार, ‘मिशन 50 लिटर’ला वेग

कमी गायींमध्ये जास्त दूध उत्पादनाचा ध्यास; राज्यासाठी ठरणार दिशादर्शक

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: संगमनेर तालुक्यामध्ये दुग्धव्यवसायातून आर्थिक समृद्धी आली आहे. या व्यवसायात अधिक संशोधन होऊन कमी गायींमध्ये,जास्त दूध उत्त्पादन तंत्र राबवण्यासाठी राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र व पंजाब या दोन राज्यांमधील प्रोग्रसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. दरम्यान, मिशन 50 लिटर या उपक्रमातून दूध उत्पादन वाढीमध्ये दुसरी क्रांती होणार असून संगमनेरचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास पंजाबचे दलजीत सिंह यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने 1500 युवक दूध उत्पादकांच्या कार्यशाळेत हा सामंजस्य करार महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये राजहंस दूध संघ अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आणि पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांच्यामध्ये स्वाक्षरी करार झाला.

याप्रसंगी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, पंजाबचे पीडीएफएचे खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, उदय तिवारी, डॉ.समध, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे,नवनाथ आरगडे, दूध संघाचे संचालक, विलास वरपे, भास्करराव सिनारे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशहा वाळुंज, विक्रम राजे थोरात, संजय पोकळे, बबनराव कु-हाडे,विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉ.प्रमोद पावसे, भारत मुंगसे, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी, विनोद हासे आदी उपस्थित होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सहकारी संस्था राज्याला दिशादर्शक ठरल्या आहे. राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दररोज सुमारे चार लाख लिटर दूध संकलन होत असून तालुक्यातून नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या व्यवसायात रणजीतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वात तालुक्यात एमडीएफ गोठा मुरघास या संकल्पना राबवल्या गेल्या.

दुग्धव्यवसायात कराराचे महत्व

पंजाब राज्याने दुग्ध क्षेत्रामध्ये केलेली क्रांती ही दिशादर्शक असून पंजाब आणि महाराष्ट्रात विविध संशोधन, दूध व्यवसायातील कल्पना, माहितीची देवाण - घेवाण, गायीचे आरोग्य व आहार याबाबत अधिक समन्वय राहावा, याकरता महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून पंजाब बरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पंजाबमध्ये होणाऱ्या नवनवीन प्रयोगांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना पंजाब मधील शेतकऱ्यांच्या गाई गोठ्यांवर जाऊन तेथील कामाची पाहणी करता येणार आहे.

दूध व्यवसायाने ग्रामीण भागामध्ये आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. आपल्या सहकारी संस्थांनी कायम शेतकरी व उत्पादकांना चांगला भाव दिला आहे. पुढील काळामध्ये कमी गायींमध्ये जास्त दूध ही संकल्प राबवण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी मिशन 50 लिटर ही मोहीम म्हणून महत्वपूर्ण ठरणार आहे.
बाळासाहेब थोरात, माजी मंत्री
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन 50 लिटर अंतर्गत 25 व्हेटर्नरी डॉक्टर यांना प्रत्येकी दहा शेतकऱ्यांच्या 10 गायींची जबाबदारी देण्यात आली आहे. या अंतर्गत 250 गायींचे आरोग्य आहार देखभाल केली जात आहे. यामधून पुढील दोन वर्षांमध्ये 50 लिटर क्षमतेच्या गायी निर्माण होतील आणि आपला तालुक्यातील शेतकरीही सात वर्षांमध्ये 50 लिटर क्षमतेच्या गायी निर्माण करील यासाठी काम सुरू आहे.
रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष राजहंस संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT