Ashok Kharat Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: समता पतसंस्थेत मोठा घोटाळा; डॉक्टर दाम्पत्याच्या नावाने ₹1.2 कोटी व्यवहाराचा संशय

अशोक खरातवर गंभीर आरोप; बनावट स्वाक्षऱ्या आणि संशयास्पद खात्यांमुळे पोलिस तपासाला वेग

पुढारी वृत्तसेवा

नगर: भोंदू अशोक खरातने केवळ राजकीय, प्रशासकीय लोकांनाच गंडवले नाहीतर प्रथीतयश डॉक्टरांनाही फसवल्याची बाब समोर आली.

दरम्यान भोंदू खरात नॉमिनी असलेल्या समता पतसंस्थेच्या डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून एक कोटी वीस लाख रुपयांचे ट्रांनझेक्शन झाले असून या खात्याची कोणतीच माहिती नसल्याचे सांगत त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचा जबाब डॉक्टर दाम्पत्याने पोलिसांसमोर दिला.

आपण समता पतसंस्थेत कधीही गेलो नाही, खाते उघडतानाची किंवा आर्थिक व्यवहार करतानाची स्वाक्षरी आमची नसल्याचा जबाब डॉक्टर दाम्पत्याने पोलिसांसमोर दिला. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्याशी जवळीक असल्याची चर्चा असणाऱ्या दीपक लोंढेची चौकशी तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. भोंदू खरातचे आर्थिक व्यवहार आणि जमीन खरेदी विक्री प्रकरणाची माहिती पोलिस लोंढेकडून जाणून घेत असल्याचे समजते.

‘समता‌’तील 76 खात्यांचे व्यवहार संशयास्पद

समता पतसंस्थेमध्ये 57 जणांच्या 100 खात्यांना भोंदू अशोक खरात नॉमिनी आहे. या खात्यातून 60 कोटीपेक्षा अधिकचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. यातील 40 खातेदारांच्या 76 खात्यांची पोलिसांनी पडताळणी केली. पडताळणी झालेल्या 40 खातेदारांनी कागदपत्रे खरी असल्याची कबुली देत त्यावर सही मात्र आपली नसल्याचे सांगत व्यवहाराचा इन्कार केला आहे. त्यामुळे या खात्यातील व्यवहार संशयाच्या गर्तेत सापडल्याचे स्पष्ट झाले आहे.

60 एकरांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव

भोंदू खरातने नातेवाईकांच्या नावे शिर्डी व सिन्नरमध्ये 60 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती दीपक लोंढेच्या चौकशीतून समोर आली आहे. त्या जमिनीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव पोलिसांकडून सुरू आहे. या खरेदी विक्रीत दीपक लोंढेचा संबंधाची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे. लोंढेकडून मात्र त्याचा इन्कार केला जात असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT