Police Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Police Attack Case: पाथर्डी तालुक्यात पोलिस पथकावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

आल्हणवाडी शिवारात अटक कारवाईदरम्यान झटापट; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी शिवारात शनिवारी हा हल्ला झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा हौसराव कर्डिले, हौसराव ज्ञानदेव कर्डिले, मनीषा हौसराव कर्डिले, समर्थ हौसराव कर्डिले आणि आदिनाथ त्रिंबक गोल्हार (सर्व रा. आल्हणावाडी, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पाथर्डी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल संजय जाधव हे एका गुन्ह्यातील फरार आरोपी कृष्णा हौसराव कर्डिले यास अटक करण्यासाठी सहकाऱ्यांसह आल्हणवाडी येथे गेले होते. आरोपी कर्डिलेच्या घराजवळ पोहोचताच त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईस विरोध दर्शवत शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली.

दरम्यान, आरोपी कृष्णा कर्डिले याने आज एकाचा तरी जीव घेतो अशी धमकी देत हातातील कुऱ्हाडीने कॉन्स्टेबल जाधव यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, जाधव यांनी प्रसंगावधान राखून वार चुकविल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिनाथ त्रिंबक गोल्हार याने मोटारसायकलची चावी देऊन घटनास्थळावरून आरोपी कृष्णा कर्डिले यास पसार होण्यास मदत केल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे. कृष्णा हौसराव कर्डिले, हौसराव ज्ञानदेव कर्डिले, मनीषा हौसराव कर्डिले, समर्थ हौसराव कर्डिले आणि आदिनाथ त्रिंबक गोल्हार (सर्व रा. आल्हणावाडी, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर अधि तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT