POCSO Pudhari
अहिल्यानगर

Parner POCSO Case: पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कीर्तनकार यशवंत थोरात अटकेत

ढवळपुरीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षावर पोक्सो अंतर्गत गुन्हा; पाच वर्षे अत्याचार केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: ढवळपुरी (ता. पारनेर) येथे श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने 17 वर्षीय मुलीवर पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीला आरोपीने गरम लोखंडी पकडीने चटके देऊन मारहाण केल्याचेही याबाबतच्या फिर्यादीत म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरातचे पीडितेच्या कुटुंबाशी घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा नातलग आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेशी संबंधित आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2011 पासून मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला.

‌‘मी दोन हाफमर्डर केलेले आहेत. कोणाला सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन,‌’ अशी भीती तो घालत होता. त्यामुळेे मुलीने हा छळ सहन केला. दरम्यान, 10 मार्च 2026 रोजी आरोपीने पीडितेला फोन करून पुन्हा धमकी देत घरी बोलावले. तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बेदम मारहाण केली.

लोखंडी पक्कड गॅसवर तापवून चटके दिले. या अमानुष कृत्यानंतर त्याने अत्याचार केला. मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. 14 मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. नातलगांच्या उपस्थितीत पीडितेने पाच वर्षांचा अत्याचार कथन केला. त्यानंतर पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

पोलिसांनी थोरातविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आणि तत्काळ आरोपीला रविवारी पहाटे ढवळपुरी येथील घरातून अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजीत मारग तपास करीत आहेत. दरम्यान, या भोंदू महाराजावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT