Ahilyanagar Women Bike Rally: अहिल्यानगरमध्ये ‘पुढारी-कस्तुरी क्लब’ची भव्य महिला बाईक रॅली; पारंपरिक वेशभूषेत रणरागिणींचा जल्लोष

शिवाजी महाराज, झाशीची राणी, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत महिलांची लक्षवेधी उपस्थिती
Ahilyanagar Women Bike Rally
Women Bike RallyPudhari
Published on
Updated on

नगर: छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून स्फूर्ती देणारी बालिका, हाती वीणा अन्‌‍ डोईवर पगडी ल्यालेल्या संत तुकाराम महाराजांच्या वेशातील तरुणी, पाठीशी बांधलेल्या बाळाला सांभाळत अन्‌‍ तळपती तलवार घेऊन झाशीच्या राणीच्या वेशात अवतरलेली विद्यार्थिनी, शुभ्रधवल वस्त्रातील वारकरी आणि भगव्या वस्त्रांतील स्वामी विवेकानंद... पारंपरिक नऊवारी आणि निळ्या जीन्सवर शुभ्र कुर्ता, अशा विविध वेशांतील विविध वयोगटांतील नगरकर महिलांच्या जल्लोषात आणि उत्साहात नगरमध्ये रविवारी ‌‘पुढारी-कस्तुरी क्लब‌’ आयोजित भव्य बाईक रॅली पार पडली.

Ahilyanagar Women Bike Rally
Tamarind Farmers Income: नगर तालुक्यात चिंचेचा आधार; बांधावरील झाडांमुळे शेतकऱ्यांना दिलासा

‌‘पुढारी‌’ माध्यम समूह आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’तर्फे जागतिक महिला दिन आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बाईक रॅलीमध्ये बुलेटसह विविध बाईकवर स्वार होत महिला-तरुणींनी आपल्यातील विजिगिषू वृत्तीचे सकारात्मक ऊर्जेचे, करारी नि निडर वृत्तीचे दर्शन घडविले. नाजूक अन्‌‍ कणखर, प्रेमळ अन्‌‍ कठोर, संवेदनशील अन्‌‍ तितकीच मृदू, त्यागमूर्ती अन्‌‍ लढवय्यी, मायेचं धन अन्‌‍ प्रेमाचं मन, अशी रणरागिणींची विविध रूपे रविवारी लक्षवेधी ठरली... पुढारी माध्यम समूहाच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. 15) सकाळी या महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Ahilyanagar Women Bike Rally
Gas Price Rise Tea Price Increase: गॅस महागला; नगरमध्ये चहा 2 तर वडापाव 5 रुपयांनी महाग

सर्जेपुरा येथील शिंगवी ज्वेलर्स येथून ही रॅली सुरू झाली. महापौर ज्योती गाडे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी आणि सहायक पोलिस निरीक्षक तेजस्विनी थोरात, शिंगवी ज्वेलर्सचे संचालक विशाल शिंगवी, क्रस्ना डायग्नोस्टिकचे रीजनल मॅनेजर अमित धारक, ‌‘कुंश मसाले‌’चे संचालक कृष्णा जाधव, ‌‘पुढारी‌’चे मार्केटिंग हेड संतोष धुमाळ, ‌‘पुढारी‌’चे ब्यूरो चीफ संदीप रोडे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी वृत्तसंपादक दीपक रोकडे, जाहिरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, सहायक वितरण व्यवस्थापक प्रमोद गायकवाड, शिंगवी ज्वेलर्सचे सुवालाल शिंगवी आदी उपस्थित होते.

मोठ्या उत्साहात बाईक रॅलीला सुरुवात झाली. शिंगवी ज्वेलर्स, सर्जेपुरा, छबुराव लांडगे चौक, प्रेमदान चौक, प्रोफेसर कॉलनी, अहिल्यादेवी होळकर चौक (भिस्तबाग), पाइपलाईन रोड, मनमाड रोड या मार्गे पुन्हा शिंगवी ज्वेलर्स, सर्जेपुरा येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीच्या माध्यमातून सहभागी महिलांनी बाईक राईडच्या आनंदाबरोबरच बक्षिसांची लयलूटही केली. आकर्षक, पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या बालिका व महिलांना शिंगवी ज्वेलर्सतर्फे बक्षिसे देण्यात आली. त्यात प्रतीभा महामुने (स्वामी विवेकानंद), वसुधा साठे (छत्रपती शिवाजी महाराज), श्रिया देशमुख (संत तुकाराम), श्वेता गोडाळकर (झाशीची राणी), सोनल तरटे (वारकरी) यांचा समावेश होता. कुंश मसालेतर्फे महिलांना आकर्षक गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.

Ahilyanagar Women Bike Rally
Moneylender Assault Worker: व्याजाच्या पैशांसाठी कामगाराला मारहाण; घरात डांबून ठेवल्याची घटना

राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक तथा अष्टपैलू कलाकार डॉ. अमोल बागूल यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नेहमीच्या आकर्षक शैलीत सूत्रसंचालन केले. दै. पुढारी परिवाराने जागतिक महिला दिन आणि गुढी पावडव्याचे निमित्त साधून महिला व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. कस्तुरी क्लबच्या माध्यमातून पुढारीने राज्यात महिला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

पुढारी आता कस्तुरीचे युनिट अहिल्यानगरमध्ये सुरू करणार आहे. महिलांनी स्वतः ला आर्थिक सक्षम बनविले पाहिजे. त्यासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय केला तरी चालेला पण व्यवसाय करण्यास लाज बाळगण्याची गरज नाही. महिला आर्थिक सक्षम झाल्यास कुटुंब आर्थिक सक्षम होते. त्यासाठी शहरातील अलकाताई मुंदडा यांचे उदाहरण द्यावे लागले. स्वतःही सक्षम आणि सून बाईला आर्थिक सक्षम बनविण्याची त्यांची धडपड कायम आहे. महिलांनी आपला इतिहास वाचला पाहिजे. आयुष्यात कितीही संकट आले तरी डगमगून जायचे नसते. त्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, झाशीची राणी यांचा आदर्श घेतला पाहिजे. निसर्गाने महिलांना प्रचंड सहनशीलता दिलेली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शिंगवी ज्वेलर्सचे ‌‘पुढारी‌’शी कौटुबिक नाते झाले आहे. त्यातून बाईक रॅलीसारख्या उपक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही काही करू शकतो, याचा आनंद यंदा आणखी वाढला. पिढ्यान्‌‍पिढ्या शुद्धतेच्या हमीसह सर्वांत कमी मजुरीसह उत्कृष्ट सोनं देऊन महिलांच्या सौंदर्याला खुलविण्याचे कार्य आम्ही जसे करतो, तसेच महिलांच्या सक्षमीकरणाच्या उपक्रमांमध्ये आमचा हातभार यापुढेही लागणार आहे. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

विशाल शिंगवी, संचालक, शिंगवी ज्वेलर्स

दै. पुढारी महिलांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबवित असते. त्यामुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळते. कस्तुरी क्लबसारखा उपक्रम पुढारी परिवाराने नगरमध्ये सुरू करावा. आजची महिलांची बाईक रॅली अभूतपूर्व झाली.

वीणाताई बोज्जा, माजी नगरसेविका

Ahilyanagar Women Bike Rally
Shrirampur Loan Collection Fraud: कर्ज वसुलीतील 3.51 लाखांचा अपहार; श्रीरामपूरमध्ये फायनान्स कर्मचाऱ्यावर गुन्हा

कुटुंबात काही अघटीत घटना घडली तरी महिला कुटुंबाचा आधारवढ बनते, असे अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे महिलांनी महापालिकेच्या माध्यमातून बचत गटांना दिले जाणाऱ्या कर्जाचा लाभ घेऊन स्वतःला सक्षम बनविले पाहिजे. ज्या घराचा कारभार महिलेच्या हाती असतो तिथे लक्ष्मीचा सहवास असतो.

महापौर ज्योती गाडे

सुपा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी म्हणाल्या, मला हे जमेल का मला ते जमेल का असा न्यूगंड महिलांनी बाजूला सारला पाहिजे. 2007 पासून पोलिस खात्यात नोकरी करीत आहे. सर्व कुटुंबाचा गाडा व्यवस्थीत सुरू आहे. महिलांनी फार प्रबळ आणि सक्षमपणे काम करणे गरजेचे आहे. महिला आहे म्हणून घर आहे. महिलाच नसेल तर घर विस्कळीत होते. बाई किरकिरी असेल तर घर किरकिरे होते. महिलांनी आणखी सक्षम होण्यासाठी निर्णय प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे. सक्षम कुटुंब व सक्षम समाजासाठी निर्णय प्रक्रियेत महिलांचा शंभर टक्के सहभाग हवा. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे. आजही ग्रामीण भागात महिलांना दुय्यमस्थान दिले जाते. पण, महिलांनी सक्षमपणे आवाज उठविला पाहिजे. पुरूषांनी महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे.

ज्योती गडकरी, पोलिस निरीक्षक, सुपा

कोतवाली पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक तेजस्विनी थोरात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, या म्हणीप्रमाणे महिलांनी काम केले पाहिजे. चूल आणि मूल या संकल्पनेला मूठमाती दिली पाहिजे. सासर आणि माहेर अशा दोन कुुटुंबाचा उद्धार महिला करते. आज महिला काही प्रमाणात स्वतःसाठी जगते. तिला आता स्वत्वाचा शोध लागला आहे. तिने स्वतःला वेळ दिला पाहिजे. महिला नोकरी करतात आणि घरची जबाबदारीही सांभाळतात. पण, तसू भरही कर्तव्यपासून बाजूला जात नाहीत. महिलांच्या डोक्यात नेहमी कुटुंबाचा विचार असतो. महिलाच कुटुंबाचा आधार असते. प्रत्येक संकटाला महिला धिरोदत्तपणे सामोरे जाते. कुटुंब आणि नोकरी सांभाळताना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी महिलांनी प्रयत्न करावेत.

तेजस्विनी थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कोतवाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news