नवनाथभाऊ दहिवाळ
अहिल्यानगर शहराच एक अविभाज्य अंग, एक नाव जे केवळ दागिन्यांसाठी नव्हे, तर विश्वासाच्या 48 वर्षांच्या अखंड परंपरेसाठी ओळखले जाते ते म्हणजे 1978 पासून ची नवनाथ भाऊ दहिवाळ यांची विश्वसनीय सुवर्ण परंपरा असलेले दहिवाळ सराफ खरवंडीकर गेली पाच दशके उलटून गेली, दहिवाळ कुटुंबाने जपलेला वारसा आजही तितक्याच तेजाने झळाळत आहे. हे केवळ एक सुवर्णदालन नाही. ही अहिल्यानगरच्या हक्काची आणि विश्वासाची जागा आहे.
दहिवाळ सराफ खरवंडीकर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती उत्तम कलाकुसर, दागिन्यांमधील नावीन्यपूर्ण डिझाइन्स आणि ग्राहकांशी जोडलेले अतूट नाते. अहिल्यानगर शहरातील विश्वसनीय सुवर्णदालन म्हणून दहिवाळ सराफ खरवंडीकर ज्वेलर्सने आपली ओळख निर्माण केली आहे, जिथे प्रत्येक सोन्याचांदीच्या दागिन्यावर 100% हॉलमार्कची आणि डायमंड्सवर प्रमाणपत्राची मोहोर असते. सोने, चांदी, हिरे, मोती, राशींचे खडे, एकापेक्षा एक सरस डिझाइन्स, शुद्धतेचा पिढ्यान पिढ्यांचा विश्वास, सोन्यापेक्षाही विश्वास असणारे सुवर्ण पिढी, अहिल्यानगर, खरवंडी, नवनागापूर, पुणे येथे दहिवाळकर सराफ यांच्याकडे सोन्याच्या मजुरीवर 75 टक्के सूट, दणदणीत डिस्काउंट खणखणीत वरायटीज, डायमंड ज्वेलरी 100% मजुरीवर सूट, एक हप्ता मोफत सुवर्ण संचय योजना, सोने खरेदीवर मिळवा चांदी फ्री, ग्राहकांचे जीवन अधिकच सोनेरी करणारी योजना सुवर्ण समृद्धी योजना यासह मंगलमय क्षणांसाठी कलाकृती यासाठी विविध प्रकारच्या यशस्वी उपक्रमांद्वारेही आपली सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. लग्नसराई आणि पाडवा या शुभमुहूर्तावर सोन्या- चांदीचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. जेव्हा खरेदीचा विचार येतो, तेव्हा अहिल्यानगरकर
आपोआपच दहिवाळ सराफ खरवंडीकर ज्वेलर्सकडे वळतात. याचे कारण स्पष्ट आहे. इथे केवळ दागिने मिळत नाहीत, तर मिळतो सर्वात योग्य घडणावळीचा दर, उत्कृष्ट सेवा आणि हवी तशी डिझाइन बनवून घेण्याची (कस्टमायझेशन) सुविधा. 48 वर्षांपासून नावीन्यपूर्ण डिझाइन्स आणि अतूट विश्वासाचा हा प्रवास असाच बहरत राहील. तर, आपल्या आयुष्यातील खास क्षणांसाठी आणि भावी पिढीसाठी मौल्यवान वारसा जतन करण्यासाठी, अहिल्यानगरकरांनी नेहमीच दहिवाळ सराफ खरवंडीकर ज्वेलर्सला आपलेसे केले आहे.
नवनाथभाऊ यांचा जीवन प्रवास - दहिवाळ सराफ खरवंडीकर ज्वेलर्सचे संचालक नवनाथभाऊ दहिवाळ यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1958 साली माळेगाव चकला तालुका गेवराई जिल्हा बीड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव चकला येथे झाले. पुढे ते आजोबा व आजी यांच्याकडे एस. एस. सी. वाल्हेश्वर विद्यालय भालगाव ता.पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथून उत्तीर्ण झाले.
वडिलोपार्जित सराफ व्यवसायाचे बाळकडू वडील भगवानराव दहिवाळ यांच्याकडून मिळाल्याचे नवनाथ भाऊ आवर्जून सांगतात. दहिवाळ सराफ खरवंडीकर शाखेची पहिली सुरुवात खरवंडी कासार येथून सुरू झाले. त्यानंतर ग्राहकांचा वाढता प्रतिसाद व विश्वासाच्या जोरावरती माळेगाव चकला, अहिल्यानगर, नवनागापूर येथे शाखा सुरू केल्या.
नवनाथभाऊ यांचा धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग - नवनाथभाऊ यांचा जन्म श्री क्षेत्र भगवानगड यांच्या पायथ्याला असलेल्या माळेगाव चकला तालुका गेवराई जिल्हा बीड येथे झाला असून साधुसंतांच्या पवित्र भूमीमध्ये जन्म झालेला असल्यामुळे धार्मिक परंपरे कडे ओढ लागली . वडिलांपासून धार्मिक कार्यांची आवड निर्माण झाली. वारकरी संप्रदायाचे माध्यमातून प्रवचनातून जनजागृती केली. श्रावण अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर नवनाथभाऊ दहिवाळ खरवंडीकर यांच्या वतीने काशी तीर्थयात्रा आणि भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते .
विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघणारा सोनार, नवनाथभाऊ - खरवंडीकर सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणाचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा... 1978 पासून सुवर्ण परंपरा जपणारे खरवंडीकर हे म्हणजेच नवनाथभाऊ दहिवाळ सराफी व्यवसायमध्ये एक सुप्रसिद्ध प्रामाणिक आणि शुद्ध सोनं देणारे सराफ म्हणून परिचित आहेत. सुवर्ण व्यवसाय मध्ये त्यांनी आपलं अध्यात्म देखील जपलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये आदर्श ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजेच नवनाथभाऊ दहिवाळ खरवंडीकर श्रीक्षेत्र भगवानगडाचे पायथ्याशी असणारा खरवंडी गावात त्यांनी वारकरी संप्रदायाची एक मोठी मोहीम सुरू केली.
व्यवसायात संत भगवान बाबा खंडोजी बाबा यांच्या आशीर्वादाने खरवंडी तसेच खरवंडी परिसरामध्ये चोख व्यवहार, प्रामाणिकपणा, पारदर्शकता विनम्र सेवा देत दहिवाळ यांनी मोठं नावलौकिक मिळवल. उंच भरारी घेत पाच शाखा सुरु केल्या आहेत. वडिलोपार्जित असणारा वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी अविरतपणे चालू ठेवला, खरवंडी गावामध्ये स्वतःच्या शेतामध्ये पंढरीचे वारकरी संत खंडुजी बाबा यांचे भव्य दिव्य मंदिर उभारले. तिथे भजन, कीर्तन सामाजिक कार्यक्रम नवनाथभाऊ घेऊ लागले. संत खंडुजी बाबा यांची वारीची पताका नवनाथभाऊंनी हाती घेतलेल्यांचा वारसा पुढे चालवत उत्तम व्यापारी ते पंढरीचे वारकरी असे नवनाथभाऊ दहिवाळ एक आदर्श व्यक्तिमत्व आहे . त्याच्या या उल्लेखनीय कार्यामुळेच त्यांना दैनिक पुढारीच्या वतीने ‘पुढारी आयकॉन’ या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
- प्रा.किशोरकुमार कांबळे, राशीन
मथुरा येथे भागवत कथेचे आयोजन
सद्गुरु साधुसंत कृपेने खंडूबाबा व वडील भगवानराव यांच्या प्रेरणेने मागीलवर्षी प्रमाणे अधिकमासामध्ये सप्ताहाचे आणि भागवत कथेचे आयोजन केले आहे. हा सप्ताह कथा श्री क्षेत्र वृंदावन (मथुरा) सप्ताह 5 जून 2026 ते 11 जून 2026 या कालावधीत होणार आहे. स्थळ-प्रभू रामचंद्र मंदिर लंबे हनुमान, परिक्रमा मार्ग वृंदावन धाम (महामंडलेश्वर श्री महंत राम श्रेष्ठ दास जी महाराज) येथे होणार आहे राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था ही असणार आहे. तरी इच्छूक भक्तांनी सप्ताहास यावे, ही नम्र विनंती.
टीप - रेल्वेचे तिकीट रिझर्वेशन हे दोन महिने अगोदर करणे गरजेचे आहे तरीही येणाऱ्या भक्तांनी आप- आपल्या पद्धतीने रेल्वे टिकीट बुकिंग करून घ्यावे. अहिल्यानगर वरून सायंकाळी आठ वाजता झेलम एक्सप्रेस तर आहेच अजून चौकशी करून योग्य ती ट्रेन (रेल्वे) तिकीट बुकिंग करून घ्यावे ही विनंती. 2 जून 2026 जाण्यासाठी आणि 14 जून 2026 येण्यासाठी अशा नियोजित तारखा आहेत.