Pimpalgaon Rotha Irrigation Project: पठार भागासाठी दिलासा! पिंपळगाव रोठा उपसा सिंचन योजनेला वेग

३५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली; मुळा धरणातून पाणी, सोलर ऊर्जेवर योजना राबवणार
Pimpalgaon Rotha Irrigation Project
Pimpalgaon Rotha Irrigation ProjectPudhari
Published on
Updated on

कान्हूरपठार : कान्हूरपठार व पठार भागास वरदान ठरणाऱ्या पिंपळगाव रोठा खंडेश्वर उपसा सिंचन योजनेच्या कामास गती मिळाली आहे. गोदावरी खोऱ्यातील तीन टप्प्यांत होणाऱ्या कामाच्या सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात झाली असून, 90 लाखांचा निधी मंजूर झाल्याचे आ. काशिनाथ दाते यांनी सांगितले.

Pimpalgaon Rotha Irrigation Project
Bhenda Theft Police Controversy: भेंड्यात चोरी प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह; पकडलेला चोरटा सोडल्याचा आरोप

टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात या संदर्भात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी भाजपचे राज्य कार्यकारुणी सदस्य विश्वनाथ कोरडे, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता इंद्रजित यादव, कनिष्ठ अभियंता प्रशांत बुरुडे, सर्व्हेअर कन्सल्टंट शुभम सांगळे, सखाराम ठुबे, गोकुळ काकडे, वसंत शिंदे, एस. पी. ठुबे, विजय काकडे, सुभाष दुधाडे, कानिफनाथ ठुबे, अर्जुन नवले, दादाभाऊ ठुबे, रमेश गाडगे, सुयश वाळुंज, संग्राम पावडे, मच्छिंद्र ठुबे, संतोष जाधव, राजेंद्र बुचुडे, सुनील चिर्के, भरत ठुबे, मंगेश खोसे, हनुमंत भागवत, संदीप मगर आदी उपस्थित होते.

Pimpalgaon Rotha Irrigation Project
Ahilyanagar Exam Center Police Action: जेऊर परीक्षा केंद्राबाहेर टपोरींवर पोलिसांचा धडक कारवाई

आ. दाते म्हणाले की, मुळा डॅम बॅक वॉटरमधून तब्बल 382 मीटर उंचीवर लिप्ट करण्यात येणार असून, 3500 क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून पठार भागाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. यामध्ये खडकवाडी, मांडवे खुर्द, वनकुटे आणि कान्हुरपठारसाठी खंडेश्वर उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. पठार भागावरील पाणीप्रश्नासाठी सतत प्रयत्नशील होतो.

Pimpalgaon Rotha Irrigation Project
Maharashtra Hailstorm Crop Damage: नेवासा तालुक्यात गारपीटीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

आता त्याला कुठेतरी यश येताना दिसत आहे. या पाठीमागे वीज बिलाची मोठी अडचण होती. परंतु आता मुळा डॅम धरणावरच सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे व लिप्टसाठी लागणारी वीज तेथेच मिळणार आहे. या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे पठार भागावरील शेतीच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा आशावाद आ. दाते यांनी व्यक्त केला.

Pimpalgaon Rotha Irrigation Project
Shivaji Maharaj Statue Controversy: टाकळीभानमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; हटवू न देण्याची ग्रामस्थांची भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र धोरणास गती मिळत आहे. मंत्री विखे यांनी दिलेला शब्द आणि आ. दाते यांचे निःस्वार्थी भावनेतून होत असलेले प्रयत्न याला यश मिळताना दिसत असल्याचे विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news