नगर: चैतन्य, नवी उमेद आणि नव्या संवत्सराच्या नव्या आशा-आकांक्षा घेऊन आलेल्या प्रकाशपर्वातील म्हणजेच दिवाळीतील लक्ष्मीपूजन आज (मंगळवारी) सर्वत्र हर्षोल्हासात साजरे करण्यात आले. शहरात सायंकाळी सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. (Latest Ahilyanagar News)
शहराच्या मध्यभागातील कापड बाजार, सराफ बाजार आणि डाळ मंडई परिसरात व्यापाऱ्यांनी आपापल्या पेढ्या-दुकाने आणि आस्थापनांमध्ये कुटुंबीयांसमवेत लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना मिठाई भरवत आबालवृद्धांनी दिवाळीचा जल्लोष साजरा केला. प्रकाशपर्वाचा उत्साह जणू शिगेला पोहचला होता.
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा उत्साह सर्वत्र दिसून आला. घरोघरी आणि बाजारपेठांमध्ये लक्ष्मी-कुबेरपूजन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी रात्री उशिरापर्यंत सुरू असून, अवघा आसमंत त्यात न्हाऊन निघाला आहे. घरोघरीही पारंपरिक रीतीने महालक्ष्मीची पूजा संपन्न झाली. संपत्ती आणि समृद्धीच्या देवीचे दर्शन घेऊन आरोग्य, सुख-समृद्धीची प्रार्थना करण्यात आली.
लक्ष्मीपूजनासाठी मंगळवारी दुपारी, सायंकाळी आणि रात्री असा तिन्ही टप्प्यांत मुहूर्त होता. व्यापारी पेढ्या, खासगी आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा उदंड उत्साह दिसून आला. लक्ष्मी आणि कुबेराच्या पूजनाचा विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोशल मीडियाद्वारे दिवाळी सेलिब्रेशनच्या रिल्स, स्टेटस, संदेश, फोटो शेअर करत शुभेच्छांची देवाणघेवाण केली जात आहे.
अहिल्यानगर शहरातील मध्यवस्तीसह सावेडी उपनगरांतील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, गुलमोहर रोड, पाइपलाईन रोड, या परिसरातील बाजारपेठांमध्ये मंगळवारीही दिवसभर खरेदीदारांची गर्दी होती. लक्ष्मीच्या मूर्तींसह पूजा साहित्य, फुले खरेदीची ठिकठिकाणी झुंबड उडाली होती. विविध संसारोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी गृहोपयोगी वस्तूंची दालनेही ग्राहकांच्या गर्दीने फुलली होती.
सोने-चांदीच्या पेढ्या आणि दुचारी व चारचाकी वाहनांची शहर परिसरातील दालनांमध्येही ग्राहकांची गर्दी दिसून आली. दिवाळीच्या मुहूर्तावर नवे वाहन घरी आणणाऱ्यांचे प्रमाणही मोठे होते. या दालनांमध्येही लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मी-कुबेरपूजन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी रात्री उशिरापर्यंत सुरू असून, अवघा आसमंत त्यात न्हाऊन निघाला आहे. घरोघरीही पारंपरिक रीतीने महालक्ष्मीची पूजा संपन्न झाली. संपत्ती आणि समृद्धीच्या देवीचे दर्शन घेऊन आरोग्य, सुख-समृद्धीची प्रार्थना करण्यात आली.
लक्ष्मीपूजनासाठी मंगळवारी दुपारी, सायंकाळी आणि रात्री असा तिन्ही टप्प्यांत मुहूर्त होता. व्यापारी पेढ्या, खासगी आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा उदंड उत्साह दिसून आला. लक्ष्मी आणि कुबेराच्या पूजनाचा विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोशल मीडियाद्वारे दिवाळी सेलिब्रेशनच्या रिल्स, स्टेटस, संदेश, फोटो शेअर करत शुभेच्छांची देवाणघेवाण केली जात आहे.
अहिल्यानगर शहरातील मध्यवस्तीसह सावेडी उपनगरांतील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, गुलमोहर रोड, पाइपलाईन रोड, या परिसरातील बाजारपेठांमध्ये मंगळवारीही दिवसभर खरेदीदारांची गर्दी होती. लक्ष्मीच्या मूर्तींसह पूजा साहित्य, फुले खरेदीची ठिकठिकाणी झुंबड उडाली होती. विविध संसारोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी गृहोपयोगी वस्तूंची दालनेही ग्राहकांच्या गर्दीने फुलली होती.
सोने-चांदीच्या पेढ्या आणि दुचारी व चारचाकी वाहनांची शहर परिसरातील दालनांमध्येही ग्राहकांची गर्दी दिसून आली. दिवाळीच्या मुहूर्तावर नवे वाहन घरी आणणाऱ्यांचे प्रमाणही मोठे होते. या दालनांमध्येही लक्ष्मीपूजन करण्यात आले.
पावसाचा शिडकावा
दिवाळीच्या आनंदात आबालवृद्ध न्हाऊन निघत असताना मंगळवारी दुपारी काही काळ पावसाने हजेरी लावली. त्यामुळे निर्माण झालेल्या गारव्यात दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाला. दरम्यान, रात्री 9 नंतर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काहीशी तारांबळ उडाली.