कोळपेवाडी: कोल्हे गटातील लौकी गावातील 17 कुटुंबियांनी भाजपच्या कमळाची साथ सोडून, आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले. ‘मागील 25 वर्षे आम्ही चुकीच्या मार्गावरुन वाटचाल करीत होतो, परंतू आम्हाला आता चांगली बुद्धी सुचली आहे. मदतीची अपेक्षा करणाऱ्यांना भरभरून देण्याचा आमदार काळे यांचा अनुभव आला आहे,’ अशा भावना यावेळी कोपरगाव तालुक्यातील लौकी गावातील पक्षांतर क-ेलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.(Latest Ahilyanagar News)
रस्त्याच्या कामासाठी आम्ही आमदार काळे यांच्याकडे गेलो, असता, आम्ही विरोधी गटाचे आहोत, याकडे न पाहता, मतदार संघातील आहोत. रस्त्याची समस्या घेवून आलो आहोत, हे पाहता आमदार काळे यांनी, रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावले, असे यावेळी काळे गटात दाखल झालेले कार्यकर्ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर ऐन जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाला भगदाड पडले आहे. आमदार काळे यांचे पारडे, कोपरगावच्या पूर्व भागात अधिकच जड झाले आहे.
कोल्हे गटाचे यशवंत कदम, सुभाष कदम, ज्ञानेश्वर कदम, दादासाहेब कदम, बापू कदम, ज्ञानेश्वर कदम, शंकर बोर्डे, भाऊसाहेब कोटकर, अनिल पवार, मधुकर खंडीझोड, शुभम खंडीझोड, रतन सोनवणे, सचिन भवर, संजय खंडीझोड, प्रतीक कदम, किरण कदम यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वपक्षात स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक दिलीप बोरनारे, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, शिवाजी ठाकरे, प्रकाश शिंदे, राजेंद्र माने, विक्रम सिनगर, भारत चौधरी, गुलाब वल्टे, शिवाजी शेळके, संदीप शिंदे, बाबासाहेब शिंदे, कानिफनाथ गुंजाळ, विजय टूपके, सुधाकर वादे, बद्रीनाथ जाधव, अंजीराम खटकाळे, दिगंबर जाधव, राजेंद्र खिलारी, सावळीराम खटकाळे, सागर खटकाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘आमदार आशुतोष काळेंच्या कार्यकाळात सर्वाधिक निधी लौकी गावाला मिळाला. कोळ नदी उकरण्यास नकार देणाऱ्या समृद्धी महामार्ग ठेकेदाराला आमदार काळे यांनी, एकाच फोनवर नदी उकरायला लावली. लौकीगाव एका विशिष्ट कुटुंबियांचा बालेकिल्ला होता, परंतू गावात आमच्या मागणीपेक्षा जास्त विकास झाला. या विकास कामांमुळे अनेक कार्यकर्ते काळे गटाशी जोडले जातील.- राजेंद्र खिलारी, राष्ट्रवादी कार्यकर्ते
‘विकासकामे करताना कधी भेदभाव केला नाही. करणार नाही. नेहमी सर्वसामान्य जनतेचाच मी विचार करतो. प्रलोभन दाखविणे हा माझा स्वभाव नाही. जे ठरवलं ते करतोच. जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापतीपदासह कोपरगावातील प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. उद्या (सोमवारी) गट- गणांचे आरक्षण जाहीर होणार आहे. यामुळे येणारा काळ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा बँक, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी पूर्व तयारीला लागावे. गेल्या 5 वर्षाततील विकासकामे जनतेपर्यंत पोहोचली आहेत. यापुढेही विकासकामांचा झंझावात असाच सुरु राहणार आहे.- आमदार आशुतोष काळे, कोपरगा