

पुणे : जागतिक स्तरावरील नामांकित ‘पिफ’ चित्रपट महोत्सव जानेवारी महिन्यात पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्याजोडीला वर्षभरात आणखी एखादा महोत्सव असावा, अशी मागणी प्रेक्षकांकडून वारंवार येत होती. त्यानुसार मागील वर्षापासून ‘मान्सून एडिशन’ नावाने महोत्सव आयोजित करत आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट त्यात दाखविण्यात येत आहेत. या महोत्सवाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मत ‘पिफ’मधील चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते यांनी व्यक्त केले.(Latest Pune News)
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच पिफच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट संग््राहालय येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या ‘मान्सून एडिशन’ महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. 11) झाले. या वेळी ते बोलत होते. या महोत्सवास पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, आदिती अक्कलकोटकर, चित्रपट समीक्षक आणि लेखिका मीना कर्णिक उपस्थित होते.
राष्ट्रीय चित्रपट संग््राहालय येथे ‘मान्सून एडिशन : 2025’ अंतर्गत शनिवारी दिग्दर्शक - फ्रान्सिस्का कोमेन्सिनी (फ्रान्स, इटली) निर्मित ‘द टाइम इट टेक्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिग्दर्शक - जीन-क्रिस्टोफ म्युराइज (फ्रान्स) यांचा चित्रपट ‘प्लास्टिक गन्स’ आणि दिग्दर्शक - ॲनी सोफी बेली (फान्स) यांचा ’माय एव्हरिथिंग’ चित्रपट दाखविण्यात आला.
रविवारी (दि. 12) सायंकाळी चार वाजता ‘डेलिरिओ’ (दिग्दर्शक ॲलेक्झांड्रा लॅटिशेव्ह सालाझार, कोस्टारिका, चिली), सायंकाळी साडेपाच वाजता ‘द वेलिंग’ (दिग्दर्शक पेड्रो मार्टिन सॅलेरो, स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिना) आणि रात्री साडेसात वाजता ‘माँग््रेाल’ (दिग्दर्शक वि लियांग चियांग, यू कियाओ यिन, तैवान, सिंगापूर, फ्रान्स) हे चित्रपट दाखिवण्यात येणार आहेत. महोत्सवातील चित्रपट विनामूल्य पाहता येतील, अशी माहिती ‘पिफ’चे उपसंचालक विशाल शिंदे यांनी दिली.