Harishchandragad Pudhari
अहिल्यानगर

Harishchandragad Kokan Kada: हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा बनतोय आत्महत्यांचे केंद्र; वर्षभरात सहा पर्यटकांचा मृत्यू

राजस्थानच्या २० वर्षीय तरुणाची ८०० फूट खोल दरीत उडी; बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर

पुढारी वृत्तसेवा

अकोले: हरिश्चंद्रगड - किल्ले म्हणून पर्यटक स्थंळ असलेल्या हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्याच्या सुमारे ८०० फुट खोल दरीत राज्यस्थान येथील खुशाल चेनाराम प्रजापती या २० वर्षीच्या तरुणांने उडी मारुन आत्महत्या केल्याने खुशालचा खोलदरीतुन रेस्क्यू टीमने खुशाल चेनाराम प्रजापती वय २० रा. रा. हरसोर ता. डेगाना जि. नागौर.(राज्यस्थान) यांचा मृतदेह वर काढुन हरिश्चंद्र गडावरुन वन्यजीव कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी पायथ्याशी आणला आहे, दरम्यान वर्षाभरात हरिश्चंद्र गडाच्या कोकणकड्यावरुन सुमारे ८०० ते ९०० फुट खोलवर दरीत उडी मारुन सहा पर्यटकांनी आत्महत्या केल्याने हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा हे आत्महत्या करणाऱ्याचे ठिकाण बनले आहे.

खुशाल चेनाराम प्रजापती वय २० रा. रा. हरसोर ता. डेगाना जि. नागौर हा राज्यस्थानहुन मुंबई मार्ग इगतपुरी असा प्रवास करत राजूर येथे दुपारी दोन वाजल्या दरम्यान आला.तसेच खुशालने एका हाँटेलधारकांच्या फोनवरून आई-.वडिलांना फोनवरून संपर्क करत सागितले, की, तुमच्या मुलाला कोणीतरी ब्लॅकमेल केल आहे. असे सांगितले. त्यानंतर खुशाल प्रजापती हा काळ्या पिवळ्या वाहनाने पाचनई गावी गेला.

तर तो पायी हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्यावर जाऊन उंडी मारली असावी, परंतु दुसऱ्या दिवशी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्बीणीने पाहिले असता, कोकणकड्याच्या खोल दरीत प्रेत दिसून आल्यावर त्यांनी राजूर पोलिसांसगे संपर्क साधला.तर खुशाल चेनाराम प्रजापती वय २० रा. रा. हरसोर ता. डेगाना जि. नागौर.(राज्यस्थान) हा बेपत्ता असल्याची कुटुंबियांनी राजूर पोलिस ठाण्यात खबर दिली.

या अनुषंगाने दि.१५ रोजी राजूर चे स.पो.नि.किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण मुठे, आनिल कोकणे सह कुटुंबीयांनी कोकणकड्यावर जाऊन खुशाल चेनाराम प्रजापती हा असल्याची खात्री केली.तर दि.१६ रोजी लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सच्या मदतीने कोकणकड्याच्या खालील सुमारे ८०० फुट खोल दरीतुन खुशाल चेनाराम प्रजापती यांचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.तर चेनाराम प्रजापती यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन राजूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कोकणकडा बनले आत्महत्येचे केंद्रबिंदु ?

हरिश्चंद्र गडावर कोकणकट्यावरील ८०० फुट खोल दरीत सहा महिण्यापुर्वी बेपत्ता पर्यटकाचा शोध घेताना सिल्वासाचा रोहित सोळुंके आणि लांतुरचा गणेश होनराव या दोघा तरुणाचे सांगाडे आणि सांगाड्यातील फुट - दोन फुटाच्या अंतराव हांडे तसेच मोबाईल कव्हर. रुमाल.वॉल्लेट. आधारकार्ड.पॅनकार्ड आढळून आले.तसेच आता पुण्याच्या गणेश सोनारचा सागाडा तर गुजरातच्या विश्वराजसिह गोईल चा मृतदेह तसेच राज्यस्थान खुशाल प्रजापती याने उडी मारून आत्महत्या केल्याने वर्षाभरात पाच - सहा जणांनी हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्यावरुन आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.तसेच सिन्नर येथील कुमार ज्ञानेश्वर भागवत वय २१ हा तरुण हरिश्चंद्र गडच्या पायथ्याशी मोटरसायकल लाऊन दि.५ आँक्टोबर बेपत्ता असल्याने राजूर,सिन्नर पोलिसांनी कुमार भागवत चा शोध हरिश्चंद्र गड परिसरात घेऊन अद्यापही त्याचा शोध लागला नाही, दरम्यान हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आत्महत्येचे केंद्रबिंदु बनले असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT