Dnyaneshwar Sugar Factory Pudhari
अहिल्यानगर

Dnyaneshwar Sugar Factory: ज्ञानेश्वर कारखान्याचा 52 वा गळीत हंगाम समाप्त; शेतकऱ्यांना वेळेत ऊस पेमेंट

प्रतिटन 3 हजार रुपये दराने ऊस बिल अदा; भविष्यातही जास्त ऊस भाव देण्याची अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

नेवासा : ज्ञानेश्वर कारखाना आता सर्वदृष्टीने परिपूर्ण झाला असून पुढील काळात कुठलाही भांडवली खर्च नाही. वेळेत ऊसतोडणी करून प्रतिटन 3 हजार रुपये प्रमाणे ऊस पेमेंट वेळेतच शेतकऱ्यांच्या बँक खाते वर्ग केले गेले. या पुढील काळात ही ज्ञानेश्वर कारखाना जास्त ऊस भाव देण्यात कायमच पुढे राहील, अशी ग्वाही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.

कारखान्याच्या 52 व्या गळीत हंगामाची सांगता गुरुवारी (दि.5) सकाळी 10 वाजता कारखान्याचे अध्यक्ष घुले पाटील यांच्या हस्ते व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक ॲड देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

संचालक काकासाहेब शिंदे, काशीनाथ नवले, प्रा.नारायण म्हस्के, शिवाजीराव कोलते, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, पंडितराव भोसले, जनार्दन कदम, सखाराम लव्हाळे, विकास नन्नवरे, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, विष्णू जगदाळे, संतोष पावसे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रवींद्र मोटे उपस्थित होते.

प्रांरभी अशोकराव मिसाळ व लताताई मिसाळ, अरुण कवडे व सौ.आरती कवडे या उभयतांच्या हस्ते विधिवत गव्हाण पूजा करण्यात आली.

घुले म्हणाले, सहकारात ऊस गाळपात कारखाना जिल्ह्यात आघाडीवर आहे. 10 लाख टन ऊस गाळप, 4 कोटी वीजनिर्यात केली. या हंगामात 1 कोटी 80 लाख लीटर इथेनॉल तयार करणार आहोत.

कारखान्याच्या माध्यमातून विविध कराचे रूपाने केंद्र सरकारला 50 कोटी रुपयांचे उत्पन्न गेले. साखर व इथेनॉलचे दर वाढून मिळावेत, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नेवून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहोत. शून्य टक्के मील बंद कारखाना चालवून जास्तीत जास्त ऊसाचे गाळप हेच लक्ष्य आहे.

माजी आ.पांडुरंग अभंग यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. संचालक ॲड.देसाई देशमुख यांनी स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT