

नगर : तालुक्यातील दोन गावांमधून दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी नगर तुालका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
तालुक्यातील एका गावात राहणारे 48 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलीला (वय 17) सोमवारी (दि.2) सकाळी कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने दुसर्या दिवशी मंगळवारी (दि. 3) अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत 33 वर्षीय महिलेले दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मुलीला (वय 16) सोमवारी (दि.2) रात्री राहत्या घरातून कोणीतरी पळवून नेले. रात्री मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचा प्रकार पहाटे दोन वाजता लक्षात आल्यानंतर फिर्यादीसह नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.