Congress District President Kidnapped 
अहिल्यानगर

Congress District President Kidnapped: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान... काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरण, मारहाण; नेमकं सत्य काय?

अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे श्रीरामपूर येथून आज सकाळी अपहरण करण्यात आलं होतं. सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना हा प्रकार घडला.

Anirudha Sankpal

Congress District President Kidnapped:

अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे श्रीरामपूर येथून आज सकाळी अपहरण करण्यात आलं होतं. सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना हा प्रकार घडला. यानंतर राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते संतप्त झाले असून या प्रकरणात आता गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.

जर हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना काही अज्ञातांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले, मारहाण केली आणि काही अंतरावर नेऊन सोडून दिले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काँग्रेसचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहे. राज्यात गृहखाते आणि पोलिस काय करत आहे? वैचारिक मतभेद असू शकतात पण म्हणून विरोधकांना संपवण्याचा घाट घातला जात आहे. पोलिस काय करतात हा प्रश्न पण आता पडत नाही कारण ते निष्प्रभ ठरले आहेत.

नेमकं काय घडलं?

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्या घराजवळून दोघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. गाडीत बसवून त्यांना मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना कपडे काढून उठाबशा काढायला लावल्या आणि जीवे मारण्याचाही प्रयत्न होता. मात्र, काही लोक मॉर्निंग वॉकसाठी फिरत असल्याचे पाहून आरोपी पळून गेले.

अपहरणकर्त्यांनी काही अंतरावर नेऊन सचिन गुजर यांना सोडून दिले. सचिन गुजर यांच्यावर श्रीरामपूर येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काँग्रेसने या घटनेचा तीव्र निषेध करत, जोपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही, तोपर्यंत निवडणुकीचा प्रचार बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेसचा तीव्र निषेध

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, लोकशाही मान्य नसलेल्या लोकांकडून ठोकशाही चालवण्याचा हा प्रयत्न आहे.

या घटनेपूर्वीही दोन नगरसेवक उमेदवारांना रात्री अटक करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि मध्यरात्री पोलीसच त्यांना माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण पाटील यांच्याकडे घेऊन गेले, जिथे त्यांना दमदाटी करण्यात आली, असे गंभीर आरोप सपकाळ यांनी केले आहेत. हे सर्व निवडणुकीच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

घटनेमागचे कारण काय?

या घटनेमागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काल रात्री सचिन गुजर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांचे अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा व्हिडिओ एआय जनरेटेड (AI-generated) असण्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

या सर्व प्रकारामुळे श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसचे आमदार हेमंत ओकले आणि त्यांचे समर्थक पोलीस स्टेशनजवळ जमा झाले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT