Chain Snatching (AI Photo)
अहिल्यानगर

Ahilyanagar Chain Snatching: चेन स्नॅचिंग वाढल्याने कोतवाली पोलिसांचा ॲक्शन प्लॅन

महिलांमध्ये जनजागृती, गस्त व नाकाबंदी वाढवली; दागिने वापराबाबत पोलिसांचे मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

नगर: कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून कोतवाली पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. पोलिसांचे पथक गार्डन, ओपन पेस, मंदिर, भाजी मंडईमध्ये जावून महिलांमध्ये जनजागृती करणार आहेत. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी कोणते दागिने वापरावे, याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरात चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कोतवाली पोलिस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांच्या दागिन्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत.

कारण शहरात गेल्या काही दिवसांमध्ये सकाळच्या वेळी पत्ता विचारण्याच्या बहाणाकरून दागिने हिसकावे, सकाळी मार्निंग ऑक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पोलिस पथक महिलांमध्ये जनजागृती करणार आहे. सकाळी फिरताना महिलांनी जास्तीचे दागिने घालू नये. दागिने घातल्यास त्यावर स्कार्प गुंडाळे जेणे करून दागिने दिसणार नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वावरताना शक्यतो बनावट दागिने वापरावे, अशा सूचना महिलांना देण्यात येत आहेत. काही घटना घडल्यास तत्काळ 112 ला फोन करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संशयास्पद हालचालीवर लक्ष

शहरातील वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा व सकाळी-संध्याकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या मार्गावर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. दुचाकीवर तैनात असणारे ‌’बीट मार्शल‌’ आता संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

शहरातील महत्त्वाचे सिग्नल, गल्ल्या आणि सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या व्यावसायिक व नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, मंदिर, चौक परिसरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचित केले आहे.

नाकाबंदी व वाहन तपासणी

शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि मुख्य रस्त्यांवर अचानक नाकाबंदी करून विनापरवाना किंवा संशयास्पद दुचाकींची कसून तपासणी केली जात आहे. विशेषतः विना नंबर प्लेट असलेल्या गाड्या पोलिसांच्या रडारवर आहेत.

महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना सोन्याचे दागिने शक्यतो झाकून ठेवावेत. मागे कोणी पाठलाग करीत असल्याची शंका आल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी जाऊन पोलिसांना कळवावे.
संभाजी गायकवाड, पोलिस निरीक्षक कोतवाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT