Bhamathan Illegal Sand Transport Pudhari
अहिल्यानगर

Bhamathan Illegal Sand Transport: भामाठाणमध्ये अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर कारवाई; १४.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

१६५ ब्रास वाळूचा साठा जप्त; टेम्पोसह चालक-मालकाविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: तालुक्यातील भामाठाण ते माळवाडगाव जाणारे रोडवर, भामाठाण शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो मिळाल्याने ५ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल तर भामाठाण शिवारात गोदावरी नदीपात्रालगत जुने गावठाणमध्ये ९ लाख ९० हजार रुपये किंमतीचा १६५ ब्रास वाळूचा साठा, असा एकूण १४ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक कल्पना अंबादास पवार यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक कल्पना अंबादास पवार यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारताच अवैध वाळू साठे व वाळू वाहतूकीवर कारवाई केली आहे.

त्यांना मिळालेल्या माहितीद्वारे पोलिस व महसूल पथकाचे संयुक्त कारवाईत भामाठाण शिवारातील गट नं. १, गट नं. २६०, गट नं. ४४ व भामाठाण जुने गावठाणमध्ये ९ लाख ९० हजार रुपये किंमतीचा १६५ ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे.

तसेच काल शनिवारी (दि. १८) रात्री १०.१५ वाजता पोलिस पथक व महसुल पथकाने संयुक्त कारवाईमध्ये भामाठाण ते माळवाडगाव जाणारे रोडवर, भामाठाण शिवारात अवैध वाळु वाहतुक करणारा टेम्पो मिळून आल्याने ५ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात या दोन्ही प्रकरणातील वाळू वाहतूक करणारा टेम्पो चालक व टेम्पो मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT