Ahilyanagar Ganesh Visarjan: गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज; १७ कृत्रिम कुंड तयार, डीजे बंदीवर प्रशासन ठाम

विसर्जन मिरवणूक मार्गाची डागडुजी पूर्ण; डीजे चालक-मालकांचे अटी-शर्तींवर परवानगीसाठी उपोषण सुरूच
Ganeshotsav Sound System Ban
Ganeshotsav Sound System BanPudhari
Published on
Updated on

नगर: श्री गणेशाची प्रतिष्ठापना होऊन पाच दिवस झाले असून, आता महापालिका प्रशासन गणेश विजर्सनाची जय्यत तयारी सुरू केली. मिरवणूक मार्गावरील रस्त्याच्या डागडुजीसह सर्व कामे करण्यात आले असून, पारंपरिक विसर्जन ठिकाणे व १७ कृत्रिम कुंड तयार केले आहेत. महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून डागडुजी सुरू आहे. तर, विसर्जनासाठी पारंपरिक तीन ठिकाणांसह १७ कृत्रिम कुंड तयार केले आहेत. तसेच कुंडामध्ये कोणत्या मूर्तीचे विसर्जन करावे, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. त्यामुळे प्रशासन डीजेच्या घेतलेल्या भूमिकेवर ठाम आहे.

Ganeshotsav Sound System Ban
Kopargaon FDA Action: कोपरगावात एफडीएची ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह’; ३.६० लाखांचा गूळ-तुपाचा साठा जप्त

मात्र दुसरीकडे डीजे चालक मालकांनी मात्र बंदीऐवजी अटी, शर्थीवर परवानगी मिळावी यासाठी उपोषणास्त्र उपसले आहे. प्रशासनाची ठाम भूमिका व डीजे चालक मालकांची मागणी पाहता यंदा विसर्जन मिरवणुकीत पेचप्रसंग ओढावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणांवर बंदी घालण्याऐवजी नियम व अटींचे बंधन घालावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील साऊंड, लाईट, जनरेटर व्‍यावसायिकांचे दुसर्‍या दिवशीही शनिवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूच होते. या उपोषणात डीचे व्‍यावसायिक सहभागी झाले आहेत. नाशिक, नागपूर येथे डीजे आणि इतरउपकरणावर बंदी घातली गेली. यंदा राज्‍यभरात डीजेवर आवाज उठविला गेला. त्याचे पडसाद अहिल्‍यानगर जिल्ह्यातही उमटले गेले. विश्‍व हिंदू परिषद, अंनिस व इतर सामाजिक संघटना व संस्‍थांनी बंदी घालण्‍याची मागणी केली.

Ganeshotsav Sound System Ban
Ahilyanagar Rain Forecast: नगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवसांच्या अंदाजाने बळिराजाच्या आशा पल्लवित!

ध्‍वनीप्रदुषण (नियंत्रण व नियमन) अधिनियम २००० तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम१९८६ मधील तरतुदीनुसार ध्‍वनी प्रदुषणाचे नियमन आणि नियंत्रणासाठी तसेच डॉल्‍बी सिस्‍टिम चालक व मालक यांना प्रत्‍येक वर्षी पर्यावरण कायदा कलम ८ प्रमाणे नोटिसा बजावून, बैठका आयोजित करुन त्‍यांचे समोपदेशन करुनही जयंती, उत्‍सवांत नियमांचे उल्‍लंघन केले जात असल्‍याचे आढळून आले. त्यामुळे जिल्‍हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार बंदी आदेश जारी केला आहे.

डिजेवरील सरसकट बंदीमुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने बंदी घालण्याऐवजी नियम व अटींचे बंधन घालावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनच्या वतीने दुसऱ्या दिवशीही शनिवारी (दि.१९) उपोषण सुरूच होते.

Ganeshotsav Sound System Ban
SC Reservation Sub Classification: अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी शिर्डीत मातंग समाजाचा एल्गार!

नियमाचे पालन करावेच लागेल

न्‍यायालयाने वेळोवेळी ध्‍वनीप्रदुषणाबाबत नियम आणि नियंत्रणाबाबत आदेश जारी केले आहेत. न्‍यायालयाच्‍या आदेशात हस्‍तक्षेप करता येत नाहीत. त्‍यामुळे खबरदारी म्‍हणून गणोशोत्‍सव आणि दसरा सणाच्‍या पार्‍श्वभूमीवर डॉल्‍बी सिस्‍टीमला प्रतिबंध करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे डॉल्‍बी सिस्‍टीम चालक-मालकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्‍याचे अपर जिल्‍हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.

एसपींकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्यासह शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. पोलिस अधिकाऱ्यांना बंदोबस्ताबाबत सूचना केल्या आहेत. मार्गावरील सीसीटीव्ही, टेहाळणी मनोरेंच्या जागा सूचविल्या आहेत.

Ganeshotsav Sound System Ban
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीची राजकीय आकडेमोड सुरू; ३८३६ मतदार ठरवणार २१ संचालक!

जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त

  • अपर अधीक्षक दोन

  • उपअधीक्षक दहा

  • पोलिस निरीक्षक दहा

  • सपोनि, उपनिरीक्षक १२०

  • एसआरपीएफची तुकडी

  • आरसीपी तीन तुकड्या

  • क्यूआरटी दोन तुकड्या

  • पोलिस अंमलदार २५००

विसर्जन ठिकाणे, कृत्रिम कुंड

  • नगर कल्याण रोड : बाळाजीबुआ विहीर

  • सावेडी, पाईपलाईन रोड : यशोदानगर विहीर

  • साईनगर : भोसले आखाडा, आरसीसी हौद

  • बोल्हेगाव : साईनगर व जि.प.शाळेमागे

  • सावेडी : निर्मलनगर व जॉगिंग ट्रॅक, भिस्तबाग, ताठे मळा

  • केडगाव : देवी मंदिर व भूषननगर

  • सारसनगर : भिंगारनाला सीना नदी कडेला (झारेकर गल्ली), शिवनेरी चौक, गोविंदपुरा, गांधी मैदान, पांजरपोळ पटांगण, दाणेडबरा, मोती नगर, नगर दौंड रोड .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news