संगमनेर: निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले, मात्र श्रेय दुसरेच घेत आहेत. श्रेयासाठी आपण कधीही काम केले नाही. भोजापूर चारी कामासाठी पाठपुराव्यासह या भागातील गादांसाठी उपसा जलसिंचन योजना आपण केल्या होत्या. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी त्या रद्द केल्या असून या योजनांवरील स्थगिती तातडीने उठवून शेतकऱ्यांना पाणी द्या, अशी मागणी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण व सेवा सोसायटीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते, अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर बी.आर चकोर, संपतराव गोडगे, सुभाष सांगळे, अनिल कांदळकर, सखाराम शर्माळे, अनिल घुगे, सरपंच जनार्दन कासार, सुनील कासार, अशोक मुळे, अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष भाऊसाहेच जगताप, दिलीप शिरसाट, त्रंबक गायकवाड, अमर कतारी, सचिन गायकवाड, कैलास मुळे उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, भोजापूर चारीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनेक वेळा पाणी दिले, यावर्षी चांगला पाऊस झाला म्हणून लवकर पाणी आले. ज्या लोकांना चारी माहिती नव्हती ते आता श्रेय घेऊन पाहत आहेत.
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले, श्रेय मात्र दुसरे घेत आहे, निमोण, नात्रज दुमाला पंचक्रोशीतील गावांना भोजपूरसह निळवंडे कालव्यांचे पाणी देण्यासाठी उपसा जलसिंचन योजना आपण मंजूर केल्या होत्या. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळेल, याकरता मध्य प्रदेश मधील माधवपूरच्या धरतीवर आपण पॅटर्न राबवण्याचे नियोजित केले होते. यासाठी आपले कामही सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार बदलले आणि सध्याच्या सरकारने या उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या. खरे तर पहिला या उपसा सिंचन स्थगिती उठून पाणी द्या. आपण सातत्याने काम केले मात्र काही मंडळी द्वेष पसरवण्याचे काम करत असून अशा लोकांना वेळीच रोखले पाहीजेत.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सुशोभीकरण करण्याकरता आपण निधी मंजूर केला आहे. सहकार्यातून मोठे काम होत असून काकडवाडी मध्ये झालेली सोसायटीची इमारत ही अत्यंत सुंदर वैभवशाली आहे.
याप्रसंगी ज्ञानदेव काळे सचिव संजय गडाख, संपत शिरसाठ रामनाथ शिरसाट, कैलास गिरी, वाल्मीक मुळे, संतोष मुळे, संजय गायकवाड, बाळू कासार सोमनाथ गांडोळे, नानासाहेब गायकवाड, संतोष ढवळे, बाळा शिरसाट, आदिनाथ झुरळे, केशव शिरसाट, विठ्ठल मुळे अशोक शिरसाट, केशरबाई मुळे, अलका मुळे, इंदुबाई ढवळे, मंदा ढवळे, बाबासाहेब गायकवाड, सदाशिव गायकवाड, रभाजी गांडोळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच जनार्दन कासार, सूत्रसंचालन सुनील कासार, तर सोसायटीचे अध्यक्ष संतोष काळे यांनी आभार मानले.