

श्रीरामपूर: बंद घराच्या मागील दरवाजाची कडी कशाच्या तरी साहाय्याने खोलून घरातील १ लाख ५० हजार रुपयाची रोख रक्कम, ३५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या असा १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
शहरातील सुखदा हाउसिंग सोसायटी येथील सुजाता गोरक्षनाथ आहेर ह्या त्यांच्या घराला कुलुप लावुन नेहमीप्रमाणे त्यांच्या बजरंग नाष्टा सेंटर दुकानावर पती, मुलगा समवेत गेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा दुकानावरुन मुलासमवेत त्या घरी गेल्या असता, मुलगा घराचे आतील रुममध्ये मोबाईल चार्जिंगला लावायला गेला, तेव्हा मागच्या घराचा दरवाजा उघडा होता. तेव्हा आत जावुन पाहिले असता
कोणीतरी मागच्या दाराने प्रवेश करुन घरातील सामानाची उचकापाचक केली होती. कपाटातील लॉकरमधील घराचे बांधकामासाठी आणलेले १ लाख ३५ हजार रुपये रोख रक्कम व दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच शोकेसमधील पर्समध्ये ठेवलेले १५,००० रुपये पाहीले असता आम्हाला मिळुन आले नाही. तसेच ३५ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा १ लाख ८५ हजार रुपयाचं ऐवज अज्ञातानी चोरून नेला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.