Hatwalan Abduction: पोलिसांचा वचक राहिला नाही? हातवळण गावात भरदिवसा तरुणाचे अपहरण; ग्रामस्थांसमोर तोडफोड आणि विटंबना

अहिल्यानगर तालुक्यातील हातवळण येथे खासगी सावकारीतून उभा राहिलेला वाद; गावात अपहरण, मारहाण, तोडफोड आणि विटंबना — ग्रामस्थांमधून संतापाचा उद्रेक
हातवळण गावात भरदिवसा तरुणाचे अपहरण
हातवळण गावात भरदिवसा तरुणाचे अपहरणPudhari
Published on
Updated on

नगर तालुका: अहिल्यानगर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी, दहशतीच्या घटना वाढत चालल्या आहेत. पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे विविध गावांनी दहशत करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. भरदिवसा ग्रामस्थांसमोर एका तरुणाचे जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करण्याची घटना हातवळण गावामध्ये शनिवार (दि.25) रोजी दुपारी घडली. यावेळी तरुणाच्या कुटुंबीयांना मारहाण, शिवीगाळ करण्यात आली. आरोपींची दहशत एवढी होती की ग्रामस्थांसमक्ष दुकानाची तोडफोड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना देखील करण्यात आली. सदर घटनेबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)

हातवळण गावात भरदिवसा तरुणाचे अपहरण
Grape Vineyards Damaged: सततच्या पावसाने द्राक्षबागा उद्ध्वस्त; कळंब द्राक्ष उत्पादक हवालदिल!

हातवळण गावात घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. भरदिवसा ग्रामस्थांसमक्ष अपहरण, कुटुंबीयांना शिवीगाळ, मारहाण, दुकानाची तोडफोड तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्याची हिम्मत येतेच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांचा वचक राहिला नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोप नागरिकांमधून होत आहे. अशी दहशत पसरवणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांमधून होत आहे. घटनेबाबत हातवळण ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पोलिस स्टेशन समोर गर्दी केली होती.

हातवळण गावात भरदिवसा तरुणाचे अपहरण
ST Crowd: सुटीनंतर कर्जत एसटी फुल्ल! बसस्थानकांवर चाकरमान्यांची प्रचंड गर्दी

रविवार (दि. 26) रोजी रात्री घटनेबाबत विवाहित महिलेने तालुका पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गणेश काकडे, माऊली पठारे (पूर्ण नाव माहीत नाही), सुनील दिलीप पठारे, अक्षय भंडारी (सर्व रा. बनपिंप्री) हे चौघेजण हातवळण गावातील घरी आले. त्यांनी विचारले तुझा नवरा कोठे आहे. त्याने माझ्याकडून घेतलेले पैसे अजून दिले नाही. त्यावेळी त्यांना सर्व पैसे दिले असल्याचे सांगितल्याने राग आला. त्यांनी सर्वांनी शिवीगाळ करून एकाने हाताला धरून बाहेर ओढले. तसेच नवरा व सासरा यांचे हातपाय काढण्याची धमकी दिली.

हातवळण गावात भरदिवसा तरुणाचे अपहरण
Congress Meeting: स्वबळावरच लढू! काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा संगमनेरातून निर्धार

त्यानंतर हातवळण गावातील चौकामध्ये असणाऱ्या सलूनच्या दुकानात पतीस लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दुकानातील खुर्च्या, आरसा, फॅन, फर्निचर, सलूनसाठी लागणाऱ्या मशिनरी तसेच इतर साहित्याची तोडफोड करून काही साहित्य बाहेर फेकून दिले. हातवळण ग्रामस्थांच्या समक्ष दुकानातील महापुरुषाच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली. फिर्यादीमध्ये 18 ग्रामस्थांची नावे देण्यात आली असून त्यांच्या समक्ष दुकानाची तोडफोड व मूर्तीची विटंबना झाल्याचे ही नमूद करण्यात आले आहे. तसेच पती यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वरील चौघांनी पळवून नेले असे फिर्यादीत म्हटले आहे.

हातवळण गावात भरदिवसा तरुणाचे अपहरण
Social Media Robbery: मामाच्या गावाला आली, तरुणाची सोशल मीडियावर रस्ता लूट

खासगी सावकारीचे कंगोरे!

घटनेला खासगी सावकारीचे कंगोरे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अव्वाच्या सव्वा रुपये व्याजदराने सावकारकी केली जात आहे. महिन्याप्रमाणे नव्हे तर तासाप्रमाणे व्याजाने पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. याची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हातवळण गावात भरदिवसा तरुणाचे अपहरण
Sugarcane Harvesting: गोड साखरेची कडू कहाणी: ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू

परिसरातील वेश्याव्यवसाय बंद करण्याची मागणी

सोलापूर महामार्गावरील अनेक हॉटेल, लॉज वेश्याव्यवसायासाठी कुप्रसिद्ध झाली आहेत. येथील वेश्या व्यवसायामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे नगर व श्रीगोंदा हद्दीतील वेश्याव्यवसाय तात्काळ बंद करण्याची देखील मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा परिसरातील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news