ZP Employee Society Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar ZP Employee Society Election: अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय कडूस

अर्जुन मंडलिक उपाध्यक्ष; स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे बिनविरोध निवड

पुढारी वृत्तसेवा

नगर: स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे सभासदांचा विश्वास संपादन केलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी संजय सुदाम कडूस व उपाध्यक्ष अर्जुन दिगंबर मंडलिक यांची काल सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळची सभा शनिवारी संस्थेच्या कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत अध्यक्ष पदासाठी संजय कडूस यांच्या नावाची सूचना संचालक प्रशांत मोरे यांनी मांडली. कैलास डावरे यांनी अनुमोदन दिले.

उपाध्यक्ष पदासाठी अर्जुन मंडलिक यांच्या नावाची सूचना भाऊसाहेब चांदणे यांनी मांडली. या सूचनेस दिलीप डांगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकाऱ्यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अर्जुन मंडलिक यांनी सर्व सहकारी संचालकांचे आभार मानून सभासदांच्या हिताचे निर्णय घेवू, असे सांगितले.

या प्रसंगी संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सुरेखा महारनूर, उपाध्यक्ष श्रीकांत देशमाने, तसेच संचालक विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, राजू दिघे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, काशिनाथ नरोडे, योगेंद्र पालवे, मनिषा साळवे, अभिजित पवार, चेतन चव्हाण, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे, संस्थेचे सभासद सुजाता भांडवलकर व कर्मचारी आदी उपस्थित होते.

‌‘जय श्री गणेश‌’ची वचनपूर्तीकडे घोडदौड

जय श्री गणेश पॅनलने निवडणुकीच्या वेळी सभासदाना दिलेल्या आश्वासनाची 100 टक्के पूर्तता करण्याचे काम हे संचालक मंडळ करत आहे. यासाठी सर्व सहकारी संचालक आणि सभासदांनी टाकलेला विश्वास आणि दिलेली मोलाची साथ महत्वाची ठरली आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपल्या संस्थेची घोडदौड सुरू आहे. यापुढेही संस्थेचे व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून विविध योजना राबविण्यात येतील, असा विश्वास नूतन अध्यक्ष संजय कडूस यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT