Ajit Pawar Demise: अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा: विवेक कोल्हे

कोपरगावात सर्वपक्षीय शोकसभेत अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली
Ajit Pawar Demise Vivek Kolhe
Ajit Pawar DemisePudhari
Published on
Updated on

कोपरगाव: राजकारणातील झंझावाती नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, ही हानी कधीही भरून न निघणारी आहे, अशी भावना युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. येथील कलश मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस कोल्हे यांनी उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Ajit Pawar Demise Vivek Kolhe
Radhakrishna Vikhe Patil Development: विकासासोबत रोजगारनिर्मितीला प्राधान्य: मंत्री विखे पाटील

विवेक कोल्हे म्हणाले, अजित पवार हे केवळ एक कणखर प्रशासक नव्हते, तर जमिनीवरचा नेता म्हणून त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात अनेकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबतच्या आठवणी आजही प्रेरणादायी असून, त्या आठवणींना उजाळा देताना मन गहिवरून येते.

Ajit Pawar Demise Vivek Kolhe
Ahilyanagar Union Budget Youth Focused: युवकांना समर्पित अर्थसंकल्प; विरोधकांचा मात्र भ्रमनिरास

मुख्यमंत्री दालनात दादांच्या अपघातापूर्वी काही तास अगोदर झालेली भेट आणि चर्चा कायम स्मरणात राहील. अनेकदा अजित पवारांनी भेटीसाठी दिलेली वेळ आणि तंतोतंत त्या आधीच निरोप यायचा,‌‘ आपण आलाय का‌’ ? इतकी वेळेची काटेकोरता होती. अगदी अपघात होण्यापुर्वी शेवटच्या स्वाक्षरी देखील जनतेच्या कामाच्या फाईलवर करून उशिरापर्यंत काम केले, असे जनतेसाठी वाहून घेतलेले नेतृत्व काळाने आपल्यापासून हिरावले आहे.

Ajit Pawar Demise Vivek Kolhe
Ahilyanagar Gram Panchayat Administrator Rule: अहिल्यानगर जिल्ह्यातील 758 ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट

विविध संस्थाच्या कामकाजाबद्दल आमची होणारी भेट आणि त्या मिटिंगमध्ये मला आवर्जून विवेक तुला काही मांडायचे आहे का, असे विचारणारे ते नेते होते. माझ्यासारख्या अनेक युवकांना शिकण्यासारखे खूप काही होते. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि सामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.

Ajit Pawar Demise Vivek Kolhe
Ahilyanagar Child Marriage Free District: महिला वकिलांचा हळदी-कुंकू सोहळा; अहिल्यानगर बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प

त्यांच्या कार्यातून आणि विचारातूनच त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.या कठीण प्रसंगी ईश्वराने संपूर्ण पवार कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे, अशी प्रार्थनाही विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. या सर्वपक्षीय शोकसभेस विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news