Water Tanker Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Water Scarcity: नगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट! २४९ गावे, १ हजार ५८८ वाड्यांना टँकरचा आधार

नऊ दिवसांत ६१ टँकरची वाढ; ५ लाखांहून अधिक नागरिकांची तहान २९४ टँकरवर अवलंबून, पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टँकर

पुढारी वृत्तसेवा

नगर: गेल्‍या नऊ दिवसांत पाथर्डी व शेवगाव शहरांसह जिल्ह्यातील ४० गावे आणि २३१७ वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्‍यामुळे नव्‍याने ६१ टँकरची वाढ झाली. पाथर्डी व शेवगाव या दोन्‍ही शहरालांही पाणीटंचाईच्‍या झळा बसल्‍या असून, या दोन्‍ही शहरांत अनुक्रमे ३ व ४ टँकर धावत आहेत. आजमितीस जिल्‍हाभरातील २४९ गावे आणि १ हजार ५८८ वाड्यांतील ५ लाख १४ हजार ३४४ लोकसंख्‍येला २९४ टँकरव्‍दारे पाणीपुरवठा सुरु असून, पाथर्डी तालुक्‍यातील टँकरचा आकडा आता १०३ वर पोहोचला आहे.

पाणीटंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या दिवसागणिक वाढू लागली. २७ ऑक्‍टोबरमध्‍ये २०९ गावे आणि १ हजार २६१ वाड्यांत पाणीटंचाईची नोंद होती. या टंचाईग्रस्‍त गावांसाठी २३३ टँकर सुरु होते. गेल्‍या नऊ दिवसांत पाणीटंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या ४० ने तर वाड्यांची संख्‍या ३१७ ने वाढली आहे. यामध्‍ये पाथर्डी व शेवगाव शहरांतील ४२ वाड्यांचा समावेश आहे. त्‍यामुळे आजमितीस टंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या २४९ तर वाड्यांची संख्‍या १ हजार ५८८ वर पोहोचली असून, या टंचाईग्रस्‍त गावांसाठी २९४ टँकरव्‍दारे पाणीपुरवठा सुरु आहे.

यापूर्वीच पारनेर शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्‍याने १३ टँकर धावत आहेत. आता नगरपालिका व तालुक्‍यांचे मुख्‍यालय असलेल्‍या या दोन्‍ही शहरांनाही पाणीटंचाईचे चटके बसले आहेत. त्‍यामुळे या मोठ्या शहरांतील नागरिकांवर पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी भटकंतीची वेळ आली. जिल्‍हा प्रशासनाने याठिकाणी टँकर सुरु करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.

जिल्ह्यात एकूण पंधरा पालिका-नगरपंचायती आहेत. या शहरांनादेखील यंदा पाणीटंचाईचे चटके बसण्‍याची शक्‍यता ग्रहीत धरुन जिल्‍हा टँकर सुरु करण्‍याचे नियोजन केले. त्‍यासाठी सव्‍वाचार कोटींचा टंचाई कृती आराखडा मंजूर केला. त्‍यानुसार या दोन शहरांत टँकर सुरु केले आहेत.

तालुकानिहाय टँकर संख्‍या

नगर : ३४, पारनेर : १९, श्रीगोंदा :५, कर्जत :३९, जामखेड :३१, शेवगाव : ३३, पाथर्डी :१००, नेवासा :२, संगमनेर : ११, पारनेर शहर :१३, पाथर्डी शहर: ३, शेवगाव शहर:४.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT