Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३५६ अधिकारी-कर्मचारी तैनात

११ जागा बिनविरोध; १० जागांसाठी २ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी; ३३ केंद्रांवर मतदानाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा बँकेच्या ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर १० जागांवर दि. २ नोव्हेंबर रोजी मतदान आणि दि. ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ३३ केंद्रावर हे मतदान घेतले जाणार आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने ३५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांना काल जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हा बँकेच्या पारनेर, राहुरी, अकोले आणि कर्जत सोसायटी मतदार संघासह दोन महिला, एक ओबीसी, एक अनुसूचित जाती जमाती, एक भटक्या विमुक्त तसेच शेतीपूरक अशा मतदार संघातील १० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा बँकेच्या मतदान प्रक्रियेसाठी २१९ अधिकारी-कर्मचारी, तर मतमोजणीसाठी ५८ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदानासाठी ६९ पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि मतमोजणीसाठी १० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण ३५६ अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी काल संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्रांवरील जबाबदाऱ्या, मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठीही आवश्यक सूचना दिल्या.

दरम्यान, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संख्येत परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो, अशी माहिती सुरवसे यांनी दिली.

अशी असेल यंत्रणा

  • निवडणूक जागा : १०

  • एकूण मतदार : ३८३७

  • नियुक्त कर्मचारी : २१९

  • पोलिस बंदोबस्त : ६९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT