Ahilyanagar Police Terror Mock Drill Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Terror Mock Drill: जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ल्याचे प्रात्यक्षिक; पोलिसांची मॉब ड्रिल

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा सराव; अतिरेकीविरोधी पथकांचा थरारक सहभाग

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी घुसलेत... सर्वत्र पळापळ धावाधाव... पोलिस प्रशासन घटनास्थळी. अतिरेक्यांना शरण घेण्याचे आवाहन. मात्र, अतिरेकी आवाहन झुकारून लावतात. पोलिस अन्‌‍ अतिरेक्यांमध्ये चकमक होते. काळी वेळात पोलिस कसबपणाला लावून अतिरेक्यांना पकडतात. शेवटी हे पोलिसांचे मॉब ड्रिल असल्याचे समजताच अनेकजण सुटकेचा निःश्वास सोडतात.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. 25) दुपारी चार वाजता अतिरेकी हल्ल्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. अतिरेकी घुसल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळते. त्यानंतर तत्काळ अतिरेकी विरोधी पथक, धडक कृती दल, श्वान पथक आदी पथके तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला चारही बाजूने घेरतात.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य विभागातीलअधिकारी-कर्मचाऱ्यांना आपत्कालीन मार्गाने कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविले जाते. त्याच वेळीत अतिरिकी विरोधी पथक, श्वान पथक, धडक कृती दलाचे जवान इमारतीवर सिडीच्या सहायाने ताबा घेतात. अतिरेकी ज्या भागात घुसलेले असतात. त्याठिकाणी सशस्त्र पोलिस या भागाचा ताबा घेतात. अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन करतात.

मात्र, काही अतिरेकी पोलिसांचा इशारा न मानता पोलिसांच्या दिशेने फायरिंग करतात. अतिरेक्याला प्रतिउत्त देऊन ठार केले जाते. विद्युत चपळाने काही पोलिस अतिरेक्यांवर झडप घालून त्यांना पकडतात. काही जखमींना तत्काळ स्ट्रेचरवरून रूग्णवाहिकेत घेऊन जातात.

अतिरेकी हल्ला झाल्यास आपत्कालीन परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जायचे, याबाबत उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस प्रशासन कशा पद्धतीने अशा घटनांना सामोरे जाते. याचा प्रत्यक्ष अनुभव उपस्थिताना अनुभवता आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT