Shirdi Ramnavami Festival: शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तिमय सुरुवात; पालख्या, भजन-कीर्तनांनी वातावरण दुमदुमले

साईबाबा संस्थानात रोषणाई व फुलांची सजावट; हजारो साईभक्तांची शिर्डीत गर्दी
Shirdi Ramnavami Festival
Shirdi Ramnavami FestivalPudhari
Published on
Updated on

शिर्डी: श्री साईबाबा संस्थानातर्फे श्री रामनवमी उत्सवास आज उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. दर वर्षीप्रमाणे मुंबई व राज्यातील विविध भागातून आलेल्या पालख्या आणि पदयात्रीच्या गर्दीने शिर्डी फुलून गेली आहे. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

Shirdi Ramnavami Festival
Shrirampur Fuel Rumour: श्रीरामपूरात इंधन तुटवड्याच्या अफवेने गोंधळ; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबचं रांगा

उत्सवाच्या प्रथम दिवशी बुधवारी पहाटे काकड आरतीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व वीणेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा घेऊन, तर प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व अतुल वाघ यांनी प्रतिमा घेऊन त्यात सहभाग घेतला. मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा प्रारंभ गाडीलकर यांनी प्रथम अध्याय वाचून केला.

Shirdi Ramnavami Festival
Ahilyanagar Bribe Case: अहिल्यानगरमध्ये लाच घेताना कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला

भोसले यांनी द्वितीय, दराडे यांनी तृतीय, सामान्य प्रशासन प्र. अधीक्षक रामदास कोकणे यांनी चौथा आणि श्री साईबाबा हॉस्पीटलचे वित्त व्यवस्थापक साहेबराव लंके यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले. गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. दरम्यान, गुरुवारीही समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. मात्र नित्याची शेजारती व शुक्रवारची काकड आरती होणार नाही.

Shirdi Ramnavami Festival
Pathardi Job Fraud: पाथर्डीत नोकरीच्या आमिषाने 30 लाखांची फसवणूक; बनावट नियुक्तीपत्रांचा धक्कादायक प्रकार

आजचे (गुरुवार) कार्यक्रम

काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्ती होऊन श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. नंतर कावडी मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान व दर्शन आणि श्रींची पाद्यपूजा. सकाळी 10 वा. विक्रम नांदेडकर (गोरटे) यांचा श्रीरामजन्म कीर्तन कार्यक्रम, दुपारी 1 वा. तुकाराम दैठणकर प्रस्तुत भक्तिगीत, अभंगवाणी, शास्त्रीय संगीत कार्यक्रम, दु. 3 वा. जागृत कोहली (आग्रा) यांचा साईभजन कार्यक्रम होईल.

दुुपारी चार वाजता निशाणाची मिरवणूक आणि नंतर श्रींच्या रथाची मिरवणूक गावातून काढण्यात येेणार आहे. सायंकाळी सात वाजता संगीतकार आनंद-मिलिंद (मुंबई) यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री सव्वानऊला पालखीची मिरवणूक निघेल.

Shirdi Ramnavami Festival
Shevgaon Water Supply Project: शेवगाव पाणीपुरवठा योजनेत त्रुटी; तांत्रिक सल्लागाराची हकालपट्टी

साईचरणी चांदीचा आकर्षक हार

श्री रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवारी जुन्नर (जि. पुणे) येथील साईभक्त बाबू जाधव यांनी 928 ग्रॅम चांदीचा आकर्षक नक्षीकाम केलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात आला. दराडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.

मंदिरात फुलांची सजावट

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त यंदा बंगळुरूचे साईभक्त वेंकट सुब्रमण्यन, यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. द्वारकामाई मंडळातर्फे विद्युत रोषणाई आणि 4 नंबर प्रवेशद्वाराच्या आत केलेली श्रीसाई मयूर द्वार या भव्य काल्पनिक देखाव्याने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news