Shrirampur Fuel Rumour: श्रीरामपूरात इंधन तुटवड्याच्या अफवेने गोंधळ; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबचं रांगा

इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर अफवा; प्रत्यक्षात पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण
Shrirampur Fuel Rumour
Shrirampur Fuel RumourPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: इराण-अमेरिका युद्ध सावटच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवडा निर्माण होणार आहे, अशी अफवा श्रीरामपूरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपांवर अक्षरशः वाहनांच्या रांगा लागल्या. गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला. बहुतांश पेट्रोल पंपांवर नागरिकांची पेट्रोल- डिझेल खरेदीसाठी भर उन्हात तासन्‌‍-तास गर्दी दाटली होती.

Shrirampur Fuel Rumour
Ahilyanagar Bribe Case: अहिल्यानगरमध्ये लाच घेताना कनिष्ठ अभियंता रंगेहात पकडला

सकाळपासून शहरासह ग्रामीण भागातील पंपांवर दुचाकी- चारचाकी वाहनांच्या लांबचं- लांब रांगा लागल्या. इंधन भरण्यासाठी वाहनचालकांमध्ये मोठी चढाओढ दिसली. काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकारही घडले. शहरातील काही पेट्रोल पंपांवर ‌‘पेट्रोल- डिझेल शिल्लक नाही,‌’ असे फलक लागल्यामुळे आणखी शंका बळावून मोठी गर्दी उसळली.

Shrirampur Fuel Rumour
Pathardi Job Fraud: पाथर्डीत नोकरीच्या आमिषाने 30 लाखांची फसवणूक; बनावट नियुक्तीपत्रांचा धक्कादायक प्रकार

काही ठिकाणी टँकर उशिरा पोहोचल्यामुळे तात्पुरती इंधन अडचण निर्माण झाली असली, तरी तुटवड्याची परिस्थिती नाही, असे सांगण्यात आले. इंधन वितरणात काही नवीन नियमांमुळे किरकोळ विलंब होत आहे, अशी माहिती मिळत असली, तरी त्याचा दीर्घकालीन तुटवड्याशी संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Shrirampur Fuel Rumour
Shevgaon Water Supply Project: शेवगाव पाणीपुरवठा योजनेत त्रुटी; तांत्रिक सल्लागाराची हकालपट्टी

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेचं लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. वास्तविक इंधन तुटवडा नसतानाही केवळ अफवांमुळे निर्माण झालेली परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Shrirampur Fuel Rumour
Shrigonda Bandh News: श्रीगोंद्यात महिलेला मारहाणीच्या निषेधार्थ बंद; सावकारीविरोधात संताप

अफवा फेटाळल्या

आंतरराष्ट्री युद्ध संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती बहुतांश नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या चर्चेमुळे पेट्रोल-डिझेलबाबत संभ्रम वाढला आहे. अनेकांनी खबरदारी म्हणून इंधन साठविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसले, मात्र, पेट्रोल पंप चालकांनी अफवा फेटाळल्या आहेत. सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news