Road Development Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar 33 Roads Development: अहिल्यानगरमध्ये ३३ रस्त्यांचा विकास; ३०० कोटींचा प्रस्ताव

सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून रस्त्यांचे सर्वेक्षण; चितळे रोड, भिस्तबाग महाल रोड, नेप्ती नाका, आयुर्वेद चौकासह प्रमुख मार्गांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या हद्दीत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून आणखी ३३ रस्ते प्रास्तावित करण्यात आले आहेत. त्यासाठी नूकत्याच झालेल्या स्थायी समितीमध्ये चर्चा होऊन सर्वेक्षणासाठी प्रकल्प सल्लागार संस्था नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर अहवाल तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविणार आहे. त्यास सुमारे ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यात चितळे रोड, भिस्तबाग महाल रोड, नेप्ती नाका, आयुर्वेद चौक, सक्कर चौक अशा महत्त्वांच्या रस्त्यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत सभापती सुभाष लोंढे यांनी प्रकल्प सल्लगार समितीस सर्व्हेक्षणास मान्यता दिली. यावेळी नगरसेवक बाबासाहेब वाकळे, सुरेश बनसोडे, मनोज कोतकर, आकाश कातोरे आदी सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शहरातील नवीन ३३ रस्त्यांच्या विकासकामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता प्रकल्प सल्लागार संस्था नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. या रस्ते विकासासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानंतर संस्था सर्व्हेक्षण करून आरखडा तयार करणार आहे. त्यानंतर तो आरखडा मंजुरीसाठी महापालिकेमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, असल्याची माहिती शहर अभियंता मनोज पारखे यांनी सभेत दिली. तसेच त्या रस्त्यावरील अतिक्रमणेही काढण्यात येईल, पाण्याच्या लाईन, विद्युत खांब अशी कामे अगोदरच करण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे.त्यावर पारखे यांनी संबंधित कंपनी सर्वेक्षण करून अहवाल तयार करेल. त्यानंतर राज्य शासनाकडून तांत्रिक मंजुरी घेण्यात येईल. निधी मंजूर झाल्यानंतर निविदा प्रक्रिया, कामावर नियंत्रण, देयके आदी कामे संबंधित एजन्सी करेल, अशी माहिती दिली.

नव्याने प्रस्तावित रस्ते

तोफखाना पोलिस ठाणे ते संग्राम चौक (भिस्तबाग महाल), श्रीराम चौक ते संघर्ष चौक (पाईपलाईन रोड, प्रेमदान चौक ते छत्रपती संभाजी महाराजपुतळा, सावेडी नाका ते पाईपलाईन रोडला जोडणारा रस्ता, भिडे चौक ते प्रेमदान हडको रस्ता, जॉगिंग ट्रॅक ते सपकाळ हॉस्पिटलपर्यंत रस्ता, डोळे हॉस्पिटल ते रासने नगर चौक, राजेंद्र हॉटेल-रानबोके चौक-सिद्धीबागेपर्यंत रस्ता, वीर सावरकर चौक ते तेलीखुंटपर्यंत रस्ता (चितळे रोड)दिल्ली गेट - जुने कोर्ट - सबजेल चौक - जुनी मनपा, धरती चौक - जुनी महानगरपालिका, नवी पेठ ते टायटन शोरुम रस्ता, रामचंद्र खुंट - झेंडीगेट - डाळ मंडई - चितळे रोड राज चेंबर -सर्जेपुरा वर्कशॉप - अल्बर्ट पेट्रोल, जुने कलेक्टर ऑफिस- सीएसआरडी,

जुने कलेक्टर ऑफिस ते चांदणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक - चाणक्य चौक -साईनगर चौक - साळुंके मळा, महात्मा फुले चौक - जिल्हा बँक रोड, नेप्ती नाका - आयुर्वेद चौक - सक्कर चौक, वाडिया पार्क - जुनी महानगरपालिका, शिवनेरी चौक - स्वीट कॉर्नर चौक - खोकरनाला पूल, सक्कर चौक-मल्हार चौक -रेल्वे स्टेशन- पुणे रोड, साईनगर भोसले आखाडा पर्यंत रस्ता, भोसले लॉन - औसरकर मळा - साळुंके घर, कायनेटिक चौक ते मल्हार चौकापर्यंत रस्ता, पुणे हायवे माणिकनगर ते हिरा मोती जनरल स्टोअर्स, केडगाव जेएलपी टॉवर कडील रस्ता केडगाव देवी मंदिरासमोरील रस्ता, झेंडा चौक ते दत्त चौक रस्ता, लिंक रोड - आनंद किराणा - संभाजी नगर चौक -वैष्णवी नगर चौक - बसस्टॉप, गोविंदपुरा नाका - गोविंदपुरा पोलिस चौकी, समर्थ अपार्टमेंट - गुलमोहर रोड - श्रीराम चौक - संत नामदेव चौक, कुष्ठधाम रोड ते जोशी फिजिक्स क्लासेस.

रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करा

शहरात नव्याने ३३ रस्ते होणार आहेत. खरत शहराच्या विकासाची ही नांदी आहे. शहर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्यासाठी नव्याने होणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करावे. जेणे करून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल, अशी मागणी नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT