Ahilyanagar Dry Drought: अहिल्यानगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर; खरीप पिकांना मोठा फटका

पावसाची ३० ते ३५ टक्के तूट; ५१ दिवसांचा खंड, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता
Drought News
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

दीपक ओहोळ

नगर: यंदाच्या पावसाने जिल्ह्यावर दुष्काळी परिस्थिती ओढवली. सरासरीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के पावसाची तूट आणि जवळपास ५१ दिवसांचा पडलेला खंड यामुळे खरीप पिके तग धरू शकली नाहीत. ज्या पिकांनी तग धरली, त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता बळावली. दमदार पावसाअभावी भूजलपातळी खालावत चालली, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून पाठविला गेला. प्रशासनाकडून आणि सॅटेलाईटद्वारे उपलब्ध माहितीनुसार शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. या निर्णयाने टंचाई उपाययोजना लवकरच सुरू होऊन दुष्काळी जनतेला दिलासा मिळणार आहे.

Drought News
Matoshri Vruddhashram Attack: मातोश्री वृद्धाश्रमात रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जखमी

यंदा एल निनोचा प्रभाव पावसावर झाल्याचे प्रकर्षाने दिसून आला आहे. जून महिन्यात सरासरी १०८.२ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त ६६ मिलिमीटरची नोंद झाली. जवळपास ३९ टक्के तूट झाली. ही तूट जुलै महिन्यात भरून निघाली. या महिन्यात तब्बल १६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अधिक पाऊस झाल्याने खरीप हंगामात ७ लाख १२ हजार ४७८ हेक्टर क्षेत्रात कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, भात व नाचणी आदी खरीप पिकांची पेरणी झाली. यामध्ये सोयाबीन २ लाख तर कापसाचा १.४३ लाख हेक्टरचा समावेश आहे

Drought News
Ahilyanagar Crime: अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणाऱ्या पत्रकारावर खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा; पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?

खरीप पेरणी झाल्यावर पिकांच्या वाढीसाठी अपेक्षित पावसाने दडी मारण्यास प्रारंभ केला. ऑगस्ट महिन्यात ९७.५ मिलिमीटर अपेक्षित असताना फक्त २७ टक्के नोंद झाली. या महिन्यात ७३ टक्के पावसाची तूट झाली. त्यामुळे काही ठिकाणी पिके जळू लागली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १४७ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असल्याने शेतकरी आशेवर होता. मात्र, या महिन्यात देखील पावसाचा प्रदीर्घ खंड पाडला. या महिन्यात आतापर्यंत फक्त ३२.७ मिलीमीटर पाऊस झाला. आशेवर बसलेल्या या महिन्यात पावसाची तब्बल ८८ टक्के तूट झाली. यंदाच्या पावसाळ्यात फक्त २६ ते २८ दिवस पाऊस झाला.

Drought News
Sangamner Crop Damage: संगमनेरात कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! दुष्काळ जाहीर करावा: आमदार खताळ

या कालावधीत सरासरी ६८ टक्के पाऊस झाला आहे. अकोले, पारनेर ,कोपरगाव व कर्जत या चार तालुक्यांत ७५ टक्केच्या आसपास पाऊस झाल्याची नोंद आहे. उर्वरित तालुक्यांची पावसाची सरासरी ५५ टक्केच आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून शसनाला अहवाल पाठविण्यात आला. नऊ तालुक्यात पावसाची प्रथम कळ (trigger-1) असल्याचे अहवालात नमूद केले. पावसाचा जवळपास ५१ दिवसांचा खंड पडला असल्याने पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद आदी पिकांच्या शेंगा पोकळ आहेत. कापूस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात फुलगळ व वोंडेगळ सुरू आहे.

Drought News
Pathardi News: कपाशीच्या शेतात गांजाची लागवड; ११.६०० किलो गांजासह सराईत हद्दपार आरोपी ताब्यात

त्यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे,असा अहवाल कृषी आयुक्तालयासमोर गेला आहे. वेळोवेळी विविध विभागांकडून उपलब्ध झालेले अहवाल आणि सॅटेलाईटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

पावसाची टक्केवारी

नगर ५८.५, पारनेर ७४.९, श्रीगोंदा ७६.७, कर्जत ७७.५, जामखेड ५८, शेवगाव ४६.९, पाथर्डी ५०.८, नेवासा ४८, राहुरी ३६, संगमनेर ७८, अकोले १३१, कोपरगाव ७५, श्रीरामपूर ३९.५, राहाता ४७.५.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news