मुंबई; पुढारी ऑनलाईन : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यांनी महाविकास आघाडीत धुसफुस असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच दांडी मारल्याने पुन्हा राजकीय भूवया उंचावल्या आहेत. नाना पटोलेंच्या वक्तव्यांनी महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांचा संतापाचा पारा चढला आहे. त्यांनी पाळत ठेवल्याचा आरोपांवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने काल चांगलाच राजकीय धुरळा उडाला.
अधिक वाचा
दरम्यान, भेट घेतलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण समावेश आहे.
पटोलेंसारख्या लहान माणसावर मी प्रतिक्रिया देत नाही. सोनिया गांधी असत्या, तर प्रतिक्रिया दिली असती अशा शब्दात नाना पटोलेंचा शरद पवारांनी समाचार घेतला होता.
पटोले यांच्या नाना विधानांवर काँग्रेसने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आज मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत नानांनी केलेले आरोप, त्यावरचे घूमजाव आणि
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असल्याची चर्चा आहे.
अधिक वाचा
नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत तर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप महाविकास आघाडीला सुरुंग लावणारे आहेत. अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. याबाबत खात्रीलायक सूत्रांकडून समजते. पटोले यांची भूमिका महाआघाडीला कमकुवत तसेच अडचणीत आणणारी आहे, असेही अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते.
पटोले यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर काही तासांतच घूमजाव करत नाना पटोले म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझी भूमिका केंद्रातील भाजप सरकारविरोधात आहे. त्यांची आमच्यावर वेगवेगळ्या
यंत्रणांमार्फत पाळत आहे, असे मी म्हणालो.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा शत्रू नाही. आमच्यात फूट पाडण्याचा भाजपचा अजेंडा आहे; मात्र तो कधीही यशस्वी होणार नाही, असे पटोले यांनी सांगितले.
माझ्यावर राज्य सरकार पाळत ठेवते, असे मी म्हणालो नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे माहिती येत असते. पोलिस त्यांना सगळी माहिती देत असतात आणि तो रुटिनचा भाग आहे, असे सांगून पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे, सरकार चांगले काम करत आहे.
हे वाचलं का ?