मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज ठाकरे-चंद्रकांत पाटील : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. यावेळी शर्मिला आणि अमित ठाकरे यांचीही उपस्थिती होती.
विशेष चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना होणार असल्याने काही संदेश घेऊन चालले आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.
या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी परप्रांतियांच्या मुद्यावरून चर्चा झाल्याचे सांगितले. राज ठाकरे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या भेटीत या दोन मुद्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे-चंद्रकांत पाटील : हिंदुत्वासाठी मी जो मार्ग पकडला तो मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे, परप्रातियांबद्दल माझ्या मनात घृणा नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी परप्रांतियाबाबतची भूमिका बदलून अधिक व्यापक झाले पाहिजे असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी येत्या मुंबई पालिका निवडणुकीत मुंबईमधील सुरक्षित जागा शोधून निवडणूक लढवावी. अमेरिकेची निवडणूक लढवायला सज्ज आहोत अशा थाटात ते दंड थोपटत असतात. त्यांनी दंड चेक करून क्षमताही चेक करावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
हे ही वाचलं का?