मुंबई

भगतसिंह कोश्यारी यांनी नौदल अधिकाऱ्यांचा केला गौरव

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत मे महिन्यात आलेल्या तौक्ते वादळात बॉम्बे हाय येथे पी-३०५ तराफ्याला भीषण अपघात झाला हाेता.या वेळी शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राजभवन येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

अधिक वाचा 

आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. उभय अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले होते. या दुर्घटनेत नागरिकांचे नुकसान  झाले होते. तर अनेकांचा मृत्यू देखील झाला होता.

अधिक वाचा 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अधिकाऱ्यांच्या शौर्याचे कौतूक करीत नौदलाच्या सर्व जवानांना शाबासकी दिली. आयएनएस तलवारचे कमान अधिकारी कॅप्टन पार्थ भट्ट जहाजावर कर्तव्य बजावत असल्याने राज्यपालांना भेटण्यास येऊ शकले नाही.

हेही वाचलंत का? 

पाहा : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT