मुंबई

तेजस ठाकरे लवकरच करणार राजकारणात प्रवेश? चर्चेला उधाण

नंदू लटके

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि मंत्री आदित्‍य ठाकरे यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे लवकर राजकारणात प्रवेश करतील, अशा चर्चेला उधाण आले आहे.या चर्चेला निमित्त ठरले आहे ते तेजस ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त जाहिरातीच्‍या माध्‍यमातून देण्‍यात आलेल्‍या शुभेच्‍छांचे.

आज तेजस यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्‍या 'सामना'मध्‍ये उद्धव ठाकरे यांचे स्‍वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी शुभेच्‍छा देणारी जाहीरात दिली आहे.

या जाहिरातीमध्‍ये तेजस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या आहेत.

या मध्‍ये तेजस ठाकरे हे 'ठाकरे कुटुंबाचा व्‍हिव्‍हियन रिचर्ड्‍स' असल्‍याचे म्‍हटले आहे. मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्‍या खास शुभेच्‍छांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

२०१९च्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्‍य ठाकरे यांनी थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली.

निवडणूक लढवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिली व्‍यक्‍ती ठरले.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्‍यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार आले.

विधानसभा निवडणूक जिंकलेले आदित्‍य ठाकरे यांच्‍याकडे पर्यावरण आणि सांस्‍कृतिक मंत्रीपदाची धुरा आली.

आता त्‍यांचे धाकटे बंधू तेजसही लवकर राजकारणात प्रवेश करतील, अशी चर्चा सूरु झाली आहे.

मी तेजस यांना दिलेल्‍या शुभेच्‍छामागे कोणाताही राजकीय हेतू नाही, असे स्‍पष्‍ट करत या चर्चेला पडदा टाकण्‍याचा प्रयत्‍न मिलिंद नार्वेकर यांनी केला आहे.

यापूर्वीही तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करतील, अशा चर्चा रंगल्‍या होत्‍या.

विधानसभा निवडणुकीच्‍या प्रचारात एका सभेत त्‍यांनी हजेरी लावली होती.

यावेळी उद्धव ठाकरे यांना त्‍यांच्‍या राजकारणातील प्रवेशाबाबत विचारणा करण्‍यात आली होती.

वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्‍य ठाकरे निवडूण आल्‍यानंतर त्‍यांच्‍याकडे असणारी युवासेनेचे प्रमुख पद तेजस ठाकरे यांच्‍याकडे सोपवली जाईल, अशी मानले जात होते. मात्र यावेळीह ती केवळ चर्चेच राहिली होती.

आता खुद्‍द मिलिंद नार्वेकरांनी जाहिरातीमध्‍येच वेस्‍ट इंडिज क्रिकेट संघाचे कर्णधार आणि धडाडीचे फलंदाज व्‍हिव्‍हियन रिचर्ड्‍स यांच्‍याशी तेजस यांची तुलना करणारी जाहीरात प्रसिद्‍ध केली आहे.

यामुळे लवकरच तेजस ठाकरे राजकीय आखाड्यात उतरतील, अशी चर्चा रंगली आहे.

याबाबत उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :बटर चिकनची ही रेसीपी खास तुमच्यासाठी | special butter chicken recipe

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT