Yashwant Killedar Dadar Ward Pudhari
मुंबई

Yashwant Killedar Dadar Ward: दादर प्रभाग मनसेकडे; यशवंत किल्लेदार प्रभाग समिती अध्यक्ष

उद्धव ठाकरे गटाकडून जोसेफ कोळींची माघार; दादर जी-उत्तरमध्ये मनसेला मिळाला मान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना (उबाठा) व मनसेतील दुरावा प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडीपर्यंत चांगलाच ताणला गेला होता. अखेर उद्धव ठाकरेंनी दादर जी-उत्तर विभागात मनसेचा एकमेव नगरसेवक असताना या प्रभागाचे अध्यक्षपद मनसेला बहाल केले आहे. त्यामुळे मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या सहा प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवड झाली. यात दादर जी उत्तर प्रभागातून उबाठाकडून जोसेफ कोळी व मनसेकडून यशवंत किल्लेदार यांनी अर्ज भरला होता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र कोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हा पेच दूर झाला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला फारसा फायदा झाला नाही. परंतु एकत्रित निवडणूक लढवल्यामुळे मनसेने स्वीकृत नगरसेवकाची मागणी केली होती. मात्र ही मागणी ठाकरे गटाने फेटाळून लावली. तीनही स्वीकृत नगरसेवक आपलेच केले. त्यामुळे ठाकरे गट व मनसेत फार काही आलबेल नव्हते.

अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावासाठी दादर माहीम प्रभाग समिती मनसेला दिली आहे. त्यामुळे किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली. आता किल्लेदार यांना मुंबई महापालिका मनसेचे गटनेते व प्रभाग समिती अध्यक्ष असे दुहेरी पदे मिळाली आहेत. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी उपस्थित होते.

प्रभाग समिती अध्यक्षांची आतापर्यंत झालेली निवड

पी दक्षिण : श्रीकला रामचंद्रन पिल्ले,भाजप

एच/पूर्व व एच/पश्चिम : रोहिणी कांबळे, शिवसेना (उबाठा)

के पश्चिम : रोहन शशिंद्र राठोड, भाजप

के/उत्तर व के/दक्षिण : प्रकाश दौलत मुसळे,भाजप

जी दक्षिण : पद्मजा चेंबूरकर, शिवसेना (उबाठा)

दादर जी उत्तर : यशवंत किल्लेदार, मनसे

प्रभादेवी जी दक्षिण : पद्मजा चेंबूरकर,

शिवसेना (उबाठा)

अंधेरी के पश्चिम : रोहन राठोड, भाजपा

जोगेश्वरी के/दक्षिण व के/उत्तर : प्रकाश मुसळे, भाजपा

गोरेगाव पी दक्षिण : श्रीकला पिल्ले, भाजपा

एच/पूर्व व एच/पश्चिम : रोहिणी कांबळे, शिवसेना (उबाठा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT