मुंबई

राज्य निवडणूक आयोग: राज्यातील २७१ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान

मोनिका क्षीरसागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ६२ तालुक्‍यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान तर ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मदान म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार, पावसामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे १२ ते १९ जुलै या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे १६ आणि १७ जुलै या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २० जुलै रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असल्याचेही राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या अशी :

नाशिक: बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6.

धुळे: धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1. जळगाव: रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6.

अहमदनगर: अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3, शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3.

पुणे: हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2.

सोलापूर: सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2, करमाळा- 8, पंढरपूर- 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4

सातारा: कराड- 9 आणि फलटण- 1.

सांगली: तासगाव- 1. औरंगाबाद: औरंगाबाद- 1,

पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3,

जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2.

बीड: बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5.

लातूर: रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4.

उस्मानाबाद: तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1.

परभणी: सेलू- 3. बुलढाणा: खामगाव- 2 आणि मलकापूर- 3. एकूण- 271.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT