Vinod Tawde Rajya Sabha Pudhari
मुंबई

Vinod Tawde Rajya Sabha: राज्यसभा वाटेवर विनोद तावडे? भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये नाव चर्चेत

रामदास आठवले, विनय सहस्रबुद्धे आणि महिला उमेदवारीवरही भाजपमध्ये हालचालींना वेग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवावयाच्या नेत्यांत ज्येष्ठ भाजप नेते विनोद तावडे यांचा समावेश असू शकेल. बिहार विधानसभा निवडणूक तसेच भाजपच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत गेल्या 5-6 वर्षांपासून महाराष्ट्राबाहेर राहिलेले तावडे भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वाचे नेते ठरले आहेत.

2019 साली विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षनिर्णयाचा कोणताही अधिक्षेप न करता केंद्रात बस्तान उभे करणाऱ्या तावडे यांना राज्यसभेवर पाठवणे उचित ठरेल, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. 2019 साली त्यांना लढायची संधी का दिली नाही हे गूढ आहे. आज तावडे राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत राज्यातील निवडणुकात सक्रिय असतात. मात्र सध्या राज्यस्तरावरील काही नेत्यांशी त्यांचे बरे नाही असे सांगितले जाते. तरीही तावडे यांचे पक्षातील स्थान लक्षात घेता त्यांची इच्छा असेल तर त्यांना राज्यसभेवर पाठवणे प्रत्यक्षात येऊ शकेल.

रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे नेते सध्या भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर पोहोचले आहेत. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. दलित अल्पसंख्याकांची मते भाजपच्या पारड्यात आठवले यांच्या मुळे पडतात. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी आठवले यांनी नुकतीच भाजप नेत्यांची भेट घेतली असे समजते. राज्यसभेत उत्तम कामगिरी नोंदवली असतानाही डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना पुन्हा संधी दिली गेली नव्हती. पीयूष गोयल यांच्यासाठी त्यांचे नाव मागे घेतले गेले होते. आता गोयल लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे गेल्या वेळी हुकलेली संधी त्याना देणे योग्य ठरेल असे बोलले जात आहे.

बौद्धिक वर्तुळ तसेच महत्त्वाच्या नियोजनविषयक निर्णयत ते महत्त्वाची भूमिका निभावतात. वरिष्ठ सभागृहात त्यांनी असणे पक्षाच्या नीती निर्धारणासाठी महत्त्वाचे ठरेल. भाजपचे चार सदस्य निवडून येण्याचे संख्याबळ असल्याने एका जागेवर महिलेलाही संधी मिळणार आहे. या वेळी एखादे नाव समोर येते की विजया रहाटकर यांची हुकलेली संधी प्रत्यक्षात येते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवावयाच्या नेत्यांत ज्येष्ठ भाजप नेते विनोद तावडे यांचा समावेश असू शकेल. बिहार विधानसभा निवडणूक तसेच भाजपच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत गेल्या 5-6 वर्षांपासून महाराष्ट्राबाहेर राहिलेले तावडे भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वाचे नेते ठरले आहेत.

2019 साली विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षनिर्णयाचा कोणताही अधिक्षेप न करता केंद्रात बस्तान उभे करणाऱ्या तावडे यांना राज्यसभेवर पाठवणे उचित ठरेल, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. 2019 साली त्यांना लढायची संधी का दिली नाही हे गूढ आहे. आज तावडे राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत राज्यातील निवडणुकात सक्रिय असतात. मात्र सध्या राज्यस्तरावरील काही नेत्यांशी त्यांचे बरे नाही असे सांगितले जाते. तरीही तावडे यांचे पक्षातील स्थान लक्षात घेता त्यांची इच्छा असेल तर त्यांना राज्यसभेवर पाठवणे प्रत्यक्षात येऊ शकेल.

रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे नेते सध्या भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर पोहोचले आहेत. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. दलित अल्पसंख्याकांची मते भाजपच्या पारड्यात आठवले यांच्या मुळे पडतात. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी आठवले यांनी नुकतीच भाजप नेत्यांची भेट घेतली असे समजते. राज्यसभेत उत्तम कामगिरी नोंदवली असतानाही डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना पुन्हा संधी दिली गेली नव्हती. पीयूष गोयल यांच्यासाठी त्यांचे नाव मागे घेतले गेले होते. आता गोयल लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे गेल्या वेळी हुकलेली संधी त्याना देणे योग्य ठरेल असे बोलले जात आहे.

बौद्धिक वर्तुळ तसेच महत्त्वाच्या नियोजनविषयक निर्णयत ते महत्त्वाची भूमिका निभावतात. वरिष्ठ सभागृहात त्यांनी असणे पक्षाच्या नीती निर्धारणासाठी महत्त्वाचे ठरेल. भाजपचे चार सदस्य निवडून येण्याचे संख्याबळ असल्याने एका जागेवर महिलेलाही संधी मिळणार आहे. या वेळी एखादे नाव समोर येते की विजया रहाटकर यांची हुकलेली संधी प्रत्यक्षात येते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT